पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी एका कार्यकर्त्याला कानशिलात मारल्याच्या घटनेनंतर वाद निर्माण झाला आहे. बारुईपूर बलात्कारआणि हत्या प्रकरणाविरोधात बुधवारी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान घडलेली ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, यावरुन भाजपकडून ममता बॅनर्जी यांना टीकेचं लक्ष्य बनवण्यात येत आहे.
Advertisement
आपल्याच कार्यकर्त्याला लगावली कानशिलात
"ममता बॅनर्जींनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावली. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने त्यांची निराशा आणि संताप यातून दिसून येतो. गेल्या १५ वर्षांत, २०२१ च्या निवडणुकीच्या निकालानंतर आमच्या अनेक कार्यकर्त्यांना एकतर जीव गमवावा लागला आहे किंवा घरे सोडून जाण्यास भाग पडले आहे," असे भाजप नेत्या केया घोष म्हणाल्या.
Advertisement
याव्यतिरिक्त, भाजपचे खासदार राजू बिस्ता यांनी असेही म्हटले आहे की, बॅनर्जींचा संयम सुटला आणि त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला थप्पड मारली.
बुधवारी शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी पोस्ट केला होता. “निवडणूक हरल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपला मानसिक तोल पूर्णपणे गमावला आहे! आज एका निषेध मोर्चादरम्यान ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्याच पक्षाच्या अनेक लोकांना मारहाण केली,” असे भंडारी यांनी X वर लिहिले.
टीएमसीने दावा फेटाळला, ममता बॅनर्जी यांना पाठिंबा
तृणमूल काँग्रेसने हा आरोप अमान्य केला असून, भाजपने केलेले आरोप 'निराधार' असल्याचे म्हटले आहे. "तिथे प्रचंड गर्दी होती. ममता दिदी फक्त परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होती. त्यांनी कोणालाही कानशिलात लगावली नाही. हे आरोप निराधार आहेत," असे एका वरिष्ठ टीएमसी नेत्याने पीटीआयला सांगितले.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, टीएमसी खासदार सौगत रॉय यांनी माजी मुख्यमंत्र्यांचा बचाव केला आणि सांगितले की, बॅनर्जी या "पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या खूप जवळ आहेत.". त्या त्यांच्यावर प्रेम दाखवतात, ... ममता बॅनर्जी आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांना जे हवे ते करू शकतात," असे रॉय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
व्हिडिओ पाहा
Former West Bengal Chief Minister Mamata Banerjee slapped a man during a TMC protest while attempting to manage the crowd and clear a path. The man is reportedly linked to the party.
The protest, held over the Baruipur case, had prior permission from the Calcutta High Court but… pic.twitter.com/tC0p62DC8H
याव्यतिरिक्त, तृणमूल काँग्रेसने पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप केला असून , पक्षाचे सुमारे ४१ कार्यकर्ते मारहाणीला बळी पडले आणि पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांचा छळ व विनयभंग झाल्याचेही म्हटले आहे.
"जमावाच्या हिंसेच्या आणि द्वेष-प्रेरित राजकारणाच्या धक्कादायक प्रदर्शनात, आमच्या ४१ कार्यकर्त्यांवर निर्घृणपणे हल्ला करण्यात आला, ज्यात अनेक जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यादरम्यान महिला कार्यकर्त्यांचा विनयभंगही झाला!" असे पक्षाने X वर लिहिले.
टीएमसीचे आरोप
टीएमसीने पुढे म्हटले की, हिंसाचाराचे प्रमाण मोठे असूनही पोलिसांनी वेळेवर मदत केली नाही. "आमच्या जखमी कार्यकर्त्यांना कोणतीही मदत न देता एसएसकेएम रुग्णालयात हलवावे लागले, तर दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले लोक विरोधी पक्षावर होणाऱ्या अत्याचारांकडे मूक प्रेक्षक बनून राहिले," असेही पक्षाने पुढे म्हटले.
ममता बॅनर्जी एकाकी
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात अनेक राजकीय भूकंप पाहायला मिळाले. अनेक मोठ्या नेत्यांनी टीएमसी सोडून एकतर भाजपमध्ये सामील होण्याचा किंवा वेगळे आघाडी स्थापन करण्याचा पर्याय निवडला. या काळात टीएमसी पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या विरोधातच काही नेत्यांनी रणशिंग फुंकल्याने पक्षात उभी फूट पडली.