For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ममता बॅनर्जी यांनी गमावले चिन्हही

06:55 AM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
ममता बॅनर्जी यांनी गमावले चिन्हही
Advertisement

निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना नवी चिन्हे

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

साधारणत: साडेचार महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर या राज्याच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. निवडून आलेल्या 80 आमदारांपैकी 58 आमदारांनी नवा गट स्थापन केला आहे. तर लोकसभेच्या 28 खासदारांपैकी 20 जण नव्या पक्षात समाविष्ट झाले आहेत. तसेच, राज्यसभेच्या 13 खासदारांपैकी दोघांनी खासदारपदे सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

Advertisement

मात्र, तृणमूल काँग्रेसची दुर्दशा एवढ्यावरच थांबलेली नाही. आता या पक्षाला त्याचे ‘फुले आणि गवत’ हे चिन्हही गमावण्याची वेळ आली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका होत असून त्यांच्यासाठी 6 ऑक्टोबरला मतदान आहे. या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही प्रतिस्पर्धी गटांना भिन्न चिन्हे आणि नावे प्रदान केली आहेत. ममता बॅनर्जी यांच्या गटाला ‘ममता तृणमूल काँग्रेस’ (ममता टीएमसी) हे नाव देण्यात आले असून प्रतिस्पर्धी गटाला ‘गणतंत्रीय तृणमूल काँग्रेस’ (डेमेक्रेटिक टीएमसी) हे नाव देण्यात आले आहे. तसेच या दोन्ही गटांना अनुक्रमे ‘फुटबॉल खेळाडू’ आणि ‘लिफाफा’ ही चिन्हे प्रदान करण्यात आल्याची माहिती दिली गेली.

वाद निवडणूक आयोगासमोर

तृणमूल काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर खरा तृणमूल काँग्रेस पक्ष कोणाचा यावर वाद भडकला आहे. तो वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पोहचला आहे. तथापि, अद्याप या वादावर आयोगाने सुनावणी पेलेली नाही. त्यामुळे ही सुनावणी होऊन अंतिम निर्णय येईपर्यंत तृणमूल काँग्रेस पक्षाचे हे मूळ नाव आणि ‘फुले आणि गवत’ हे मूळ चिन्ह अस्थायी स्वरुपात गोठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वादावर आयोगाने अंतिम निर्णय दिल्यानंतर मूळ नाव आणि चिन्ह कोणत्या गटाला द्यायचे, यासंबंधीचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे.

ममता बॅनर्जी यांच्या उमेदवाराची माघार

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकांपूर्वी ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांच्या गटाच्या उमेदवार संचिता प्रधान डे यांनी त्यांचे उमेदवारी आवेदन पत्र मागे घेतले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्या गटाचा उमेदवार असणार नाही. बॅनर्जी यांनी आता येथे काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा घोषित केला आहे. संचिता प्रधान डे यांनी आपले आवेदन पत्र मागे घेण्यापूर्वी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी त्वरित आपले नामांकन मागे घेण्याचा निर्णय घोषित केल्याची माहिती आहे. रेजीनगर या अन्य मतदारसंघात मात्र ममता बॅनर्जी गटाचा उमेदवार लढणार आहे.

‘तृणमूल’चा अन्य गट संघर्षात

तृणमूल काँग्रेसच्या रितुब्रत बॅनर्जी गटाने राज्यातील दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये आपले उमेदवार दिले आहेत. नंदीग्राम मतदारसंघात या गटाने मोहम्मद एतेशामुल हक यांना उमेदवारी दिली आहे. तर रेजीनगर मतदारसंघात या गटाने सैफुझ्झमान शेख यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. तृणमूल काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतरची ही या गटाची पहिलीच निवडणूक कसोटी आहे. नंदीग्राममध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्याशी या गटाला स्पर्धा करायची आहे. तर रेजीनगरमध्ये भारतीय जनता पक्ष, ममता बॅनर्जी गट आणि काँग्रेस या तीन पक्षांशी या गटाला स्पर्धा करायची आहे. या बहुरंगी संघर्षामुळे या दोन्ही मतदारसंघांमधील पोटनिवडणुक अत्यंत चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. नंदीग्राम मतदारसंघ मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी सोडल्याने तेथे पोटनिवडणूक होत आहे. तर रेजिनगर विधानसभा मतदारसंघ हुमायून कबीर यांनी सोडलेला आहे.

बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के

ड तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना अनुक्रमे ‘फुटबॉल खेळाडू’-‘लिफाफा’

ड दोन्ही गटांना अनुक्रमे ममता टीएमसी आणि डेमॉक्रेटिक टीएमसी नावे

ड ममता बॅनर्जी गटाच्या उमेदवाराची नंदीग्राम मतदारसंघामधून माघार

ड ममता बॅनर्जी यांच्या गटाचा नंदीग्राम मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा

Advertisement
Tags :

.