महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मालविका बनसोडची गिल्मूरवरही मात

06:00 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/चांगझाऊ, चीन

Advertisement

भारताची युवा बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवत चायना ओपन सुपर 1000 स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. तिने संघर्षपूर्ण लढतीत तिच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या किर्स्टी गिल्मूरवर मात केली. जागतिक क्रमवारीत 43 व्या स्थानावर असणाऱ्या मालविकाने एक तास पाच मिनिटे चाललेल्या झुंजीत गिल्मूरवर 21-17, 19-21, 21-16 अशी मात केली. सुपर 1000 स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. स्कॉटलंडची गिल्मूर ही जागतिक क्रमवारीत 25 व्या स्थानावर असून तिने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदके मिळविली आहेत. मालविकाची पुढील लढत चौथ्या मानांकित व दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन जपानच्या अकाने यामागुचीशी होणार आहे.

Advertisement

यापूर्वी झालेल्या दोन्ही लढतीत यामागुचीने मालविकाला हरविले आहे. पण त्यापैकी एका लढतीत मालविका जिंकण्याच्या स्थितीत पोहोचली होती. तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी होण्याची अपेक्षा मालविकाने केली आहे. ‘सुपर 1000 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याची माझी ही पहिलीच वेळ असल्याने एकप्रकारे माझे स्वप्न साकार झाले आहे. आजवरच्या कारकिर्दीतील माझी ही सर्वोच्च अचीव्हमेंट आहे,’ अशा भावना मालविकाने विजयानंतर व्यक्त केल्या. गिल्मूरविरुद्ध तिच्या आजवर पाच लढती झाल्या, त्यापैकी 3 मालविकाने जिंकल्या तर गिल्मूरने 2 जिंकल्या आहेत.  आधीच्या फेरीत तिने पॅरिस ऑलिम्पिक कांस्यविजेत्या इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगला पराभवाचा धक्का दिला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article