For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीत उद्यापासून मालवणी करंडक महोत्सव

05:26 PM Feb 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीत उद्यापासून मालवणी करंडक महोत्सव
Advertisement

पालकमंत्री नितेश राणेंसह मान्यवरांची उपस्थिती

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

ओंकार कलामंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून उद्या सावंतवाडी जगन्नाथराव भोसले उद्यान येथे सायंकाळी ६ वाजता रंगणाऱ्या मालवणी करंडक महोत्सवासाठी पालकमंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिवसेना नेते तथा आमदार निलेश राणे, माजी खासदार विनायक राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. त्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त जिल्ह्यातील जेष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहेतर या महोत्सवाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. दरम्यान या महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत मुंबई,पुणे ,गोवा व रत्नागिरी यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ एकांकिका संघ सहभागी होणार आहेत. तर या कार्यक्रमाचे औचित्य साधून "फूड फेस्टिवलचे" आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे याचा लाभ सावंतवाडीकरांनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. हा महोत्सव उद्यापासून होत आहे. या पार्श्वभूमीवर आज श्री. साळगावकर यांनी ही माहिती दिली. ​सावंतवाडीचा सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात कै. आबा नेवगी यांच्या स्मरणार्थ चेतन नेवगी पुरस्कृत पुरस्कार,सचिन धोपेश्वरकर (सावंतवाडी), अंकुश कुंभार (कुडाळ) या दोघांना देण्यात येणार आहे तर ज्येष्ठ रंगकर्मी दिनकर धारणकर यांच्या स्मरणार्थ हर्षवर्धन धारणकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला पुरस्कार सगुण पोळेकर (मालवण), आनंद नार्वेकर (वेंगुर्ला) या दोघांना देण्यात येणार आहे. तर शंकर बिद्रे यांच्या स्मरणार्थ महेश बिद्रे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला पुरस्कार भाई सामंत यांना देवून विशेष गौरव केला जाणार आहे. कला सादरीकरणासोबतच पर्यटकांना आणि स्थानिकांना मालवणीसह विविध खाद्यपदार्थांची मेजवानी मिळावी यासाठी 'फूड फेस्टिवल'चेही आयोजन करण्यात आले आहे. ​मेजर जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर रंगणाऱ्या या सोहळ्याला कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महोत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष अमोल टेंबकर, उपाध्यक्ष ऋजूल पाटणकर, दादा मडकईकर,भुवन नाईक सचिन मोरजकर, हेमंत पांगम, प्रशांत सावंत, आनंद काष्टे,मृणाल पावसकर,साहिल सावंत, हर्ष जाधव,सावली पाटकर,भालचंद्र लांबर,प्रणव तारी आदी उपस्थित होते

Advertisement

Advertisement
Tags :

.