For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मालवणात उबाठा शिवसेनेतर्फे 100 वनराई बंधाऱ्यांचा संकल्प; आडवण येथे पहिल्या बंधाऱ्याचे काम सुरू

05:20 PM Oct 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
मालवणात उबाठा शिवसेनेतर्फे 100 वनराई बंधाऱ्यांचा संकल्प  आडवण येथे पहिल्या बंधाऱ्याचे काम सुरू
Advertisement

मालवण प्रतिनिधी : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवणात 100 वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मालवण शहरातील आडवण येथे जलस्रोतावर मातीचा बंधारा घालून करण्यात आला.

Advertisement

उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने आडवण येथील जलस्रोतावर मातीचा बंधारा उभारला. या बंधाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह अडवून ते साठवून ठेवण्यास मदत होणार असून, परिसरातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमावेळी नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, उबाठा शिवसेना महिला उपतालुकाप्रमुख रूपा कुडाळकर, मालवण शहरप्रमुख राधिका मोंडकर, मनोज मोंडकर, गणेश चव्हाण, दत्ता पोईपकर तसेच स्थानिक नागरिक उत्तम चव्हाण, शशिकांत यादव, सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी माजी नगरसेविका पूजा करलकर यांनी सांगितले की, शासनाने दुष्काळ जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी वैभव नाईक यांनी 100 वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून आडवण येथे बंधारा उभारण्यात आला.

मालवण नगरपालिका विविध कामांमध्ये व्यस्त असल्याने पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून वैभव नाईक यांच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बंधारा उभारणीसाठी उबाठा शिवसेनेचे नगरसेवक तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभल्याचे करलकर यांनी सांगितले.

आगामी काळात मालवण तालुक्यातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारे वनराई बंधारे उभारून पाणीसाठा वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.