आचरा गावपळणीत सहभागी ग्रामस्थांची मालवण तहसीलदारांनी घेतली भेट
महिला वर्गाशी चर्चा करत घेतला दिनक्रम जाणून
आचरा प्रतिनिधी
रविवार १५ डिसेंबर पासून सुरू झालेल्या आचरा गावच्या गावपळणीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.गावपळणीत सहभागी झालेल्या गावाकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी मालवण तालुक्याच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी चिंदर, करिवणे येथील राहुटयांना भेटी दिल्या. यावेळी देवस्थान सचिव, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, खजिनदार कपिल गुरव, रवींद्र गुरव, पत्रकार परेश सावंत ,उदय बापर्डेकर, पंकज आचरेकर, किशोरी आचरेकर, वृषाली आचरेकर मंडल अधिकारी अजय परब व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार झाल्टे यांनी महिला वर्गाशी हितगुज केले . महिलांना कोणत्या समस्या आहेत याबाबत विचाराणा करत आरोग्य विषयक कोणत्याही अडचणी असल्यास आपणास कळवावे अशा सूचना केल्या. दिवसभराचा दिनक्रम कसा असतो याबाबत महिलांकडून माहिती घेतली. यावेळी रामेश्वर देवस्थानचे सचिव संतोष मिराशी, खजिनदार कपिल गुरव यांनी आचरा गावपळण विषयी सविस्तर माहिती देत तीन दिवसाचे व्यवस्थापन योग्यरितीने केल्याची माहिती दिली.