For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवण नगरपरिषदेची मोकाट गुरांविरोधात कारवाई सुरू

मालवण नगरपरिषदेची मोकाट गुरांविरोधात कारवाई सुरू
Advertisement

मालवण : शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतुकीस निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन मालवण नगरपरिषदेमार्फत मोकाट गुरे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

या मोहिमेदरम्यान नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध भागांत फिरणाऱ्या मोकाट गुरांना पकडून ताब्यात घेतले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे.

मोकाट गुरे रस्त्यावर सोडणाऱ्या पशुमालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती व्यवस्था करावी. अन्यथा नगरपरिषदेच्या नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Advertisement

“स्वच्छ, सुंदर व सुरक्षित मालवण” या उद्देशाने नगरपरिषदेकडून ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.