For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मालवणच्या स्वच्छता व्यवस्थापनासाठी नगराध्यक्षा ममता वराडकर, सभापती पूनम चव्हाण बंगळुरू दौऱ्यावर; घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि आधुनिक स्वच्छता तंत्रज्ञानाचा घेणार अभ्यास

02:39 PM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
मालवणच्या स्वच्छता व्यवस्थापनासाठी नगराध्यक्षा ममता वराडकर  सभापती पूनम चव्हाण बंगळुरू दौऱ्यावर  घनकचरा व्यवस्थापन  सांडपाणी प्रक्रिया आणि आधुनिक स्वच्छता तंत्रज्ञानाचा घेणार अभ्यास
Advertisement
मालवण : मालवण शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रियेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ममता वराडकर आणि स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी बंगळुरू येथे रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारीही या दौऱ्यात सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासन आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) अंतर्गत इंडियन सॅनिटेशन कोअॅलिशन (ISC) यांच्या मार्गदर्शनाखाली, HSBC च्या आर्थिक सहकार्याने आणि CDD India यांच्या अंमलबजावणीत 'Climate Resilient Coastal Cities (CRCC) Phase 2' हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

या दौऱ्यात घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, मल अवशेष व्यवस्थापन (FSM) आणि सांडपाणी प्रक्रिया यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे आधुनिक तंत्रज्ञान, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यपद्धती आणि यशस्वी प्रकल्पांची माहिती घेतली जाणार आहे.

दौऱ्यादरम्यान विविध प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या कामकाजाची पाहणी केली जाणार असून, संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शनही मिळणार आहे. त्यामुळे स्वच्छता व्यवस्थापनातील आधुनिक पद्धती आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांची माहिती मालवणच्या प्रतिनिधींना मिळणार आहे.

Advertisement

मालवण हे महत्त्वाचे पर्यटन आणि किनारपट्टीवरील शहर असल्याने येथील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, सांडपाणी प्रक्रिया आणि स्वच्छता व्यवस्था प्रभावी असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरू अभ्यास दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दौऱ्यातून मिळणाऱ्या अनुभवाचा उपयोग मालवण शहरातील स्वच्छता आणि पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या अभ्यास दौऱ्यात नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्यासह पाणीपुरवठा अभियंता अमोल काटवळ, स्वच्छता निरीक्षक संजय पवार, आरोग्य लिपिक मंदार केळुसकर आणि शहर समन्वयक अनिकेत चव्हाण सहभागी झाले आहेत.

Advertisement
Tags :

.