For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवण मच्छी मार्केटची अवस्था बिकट;अस्वच्छता, सांडपाणी अन् तुटलेली शटर;नगरसेवकांकडून स्पॉट पंचनामा

मालवण मच्छी मार्केटची अवस्था बिकट अस्वच्छता  सांडपाणी अन् तुटलेली शटर नगरसेवकांकडून स्पॉट पंचनामा
Advertisement

Advertisement

malvan-fish-market-poor-condition-corporators-spot-inspection

malvan-fish-market-poor-condition-corporators-spot-inspection

Advertisement

मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील मच्छी मार्केटच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मार्केटमधील अस्वच्छता आणि विविध सुविधांच्या अभावामुळे मच्छी विक्रेते तसेच नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार ओरसकर आणि तपस्वी मयेकर यांनी मच्छी मार्केटची पाहणी करून स्पॉट पंचनामा केला.

पाहणीदरम्यान महिला व पुरुष स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था, परिसरातील दुर्गंधी, उघड्यावर वाहणारे सांडपाणी, नादुरुस्त प्रकाश व्यवस्था, तुटलेली शटर तसेच मार्केटमध्ये कुत्र्यांचा वावर यासारख्या समस्या निदर्शनास आल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

मच्छी मार्केटच्या दुरुस्तीचे आश्वासन जानेवारी महिन्यात देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आठ महिने उलटूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मच्छी मार्केट हे शहरातील नागरिक आणि मच्छी विक्रेत्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे स्वच्छता, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मच्छी मार्केटची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छतेबाबत आवश्यक कार्यवाही करावी; अन्यथा नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेवक मंदार ओरसकर आणि तपस्वी मयेकर यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.