For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दांडी येथे गोवा बनावटीच्या दारूचा ५.३८ लाखांचा साठा जप्त; ८० बॉक्स हस्तगत, तिघांविरोधात गुन्हा दाखल

10:54 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
दांडी येथे गोवा बनावटीच्या दारूचा ५ ३८ लाखांचा साठा जप्त  ८० बॉक्स हस्तगत  तिघांविरोधात गुन्हा दाखल
Advertisement
मालवण : मालवण तालुक्यातील दांडी येथे गोवा बनावटीच्या दारूच्या अवैध साठ्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत विविध ब्रँडच्या दारूचे ८० बॉक्स जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या दारूची किंमत सुमारे ५ लाख ३८ हजार रुपये असून, या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालवण परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. दांडी येथे गोवा बनावटीच्या दारूचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूचे ८० बॉक्स आढळून आले. पोलिसांनी हा संपूर्ण साठा जप्त केला.

Advertisement

ही कारवाई पोलिस अधीक्षक मोहन दहीकर आणि अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश माने, पोलिस उपनिरीक्षक भगत, पोलिस उपनिरीक्षक अभिजित भोसले, हवालदार सुहास पांचाळ आणि हवालदार सुप्रिया पवार यांचा सहभाग होता.

Advertisement

या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा बेकायदेशीर व्यवहारांविरोधात पुढील काळातही कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Advertisement
Tags :

.