For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मालवणमध्ये उद्यापासून रंगणार ‘बीच लोककला महोत्सव’;10 व 11 ऑक्टोबरला स्थानिक लोककलांचा जागर; मालवण बंदर जेटी वाहनतळावर विनामूल्य प्रवेश

05:37 PM Oct 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
मालवणमध्ये उद्यापासून रंगणार ‘बीच लोककला महोत्सव’ 10 व 11 ऑक्टोबरला स्थानिक लोककलांचा जागर  मालवण बंदर जेटी वाहनतळावर विनामूल्य प्रवेश
Advertisement
मालवण (प्रतिनिधी) : कोकणच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणारा ‘बीच लोककला महोत्सव’ शनिवार, 10 आणि रविवार, 11 ऑक्टोबर रोजी मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय महोत्सवात स्थानिक लोककलावंत विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करणार आहेत. मालवण बंदर जेटी वाहनतळ येथे सायंकाळी 5.30 वाजल्यापासून महोत्सवाला सुरुवात होणार असून, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला समृद्ध करणाऱ्या पारंपरिक कलांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात स्थानिक लोककला पथकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मालवणमधील नागरिकांसह पर्यटकांनाही कोकणच्या सांस्कृतिक वारशाचा जवळून अनुभव घेता येणार आहे.

Advertisement

सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील पारंपरिक लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मालवणमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवामुळे स्थानिक लोककलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळण्याबरोबरच कोकणच्या लोककलांचा प्रसार होण्यास मदत होणार आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवणमध्ये आयोजित या सांस्कृतिक सोहळ्यामुळे पर्यटकांसाठीही विशेष आकर्षण निर्माण होणार आहे.

Advertisement

महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून, मालवणसह परिसरातील नागरिक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक लोककलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.