महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गैरप्रकारांमुळे कारागृह प्रशासनाची प्रतिमा मलिन: पालकमंत्री हसन मुश्रीफ

04:35 PM Nov 06, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

पालकमंत्री हसन मुश्रीफ : प्रामणिकपणे काम करून प्रतिमा बदलण्याचे आवाहन : कळंबा कारागृहातील बंदीजनांच्या स्टॉलचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

कळंबा प्रतिनिधी

Advertisement

कारागृहात अलीकडच्या काळात कैदी पळून जाणे, मोबाईल-गांजा सापडने असे प्रकार वाढले आहेत. यामुळे कारगृहातील पोलिसांची प्रतिम मलीन होत आहे. प्रामाणिकपणाने काम करून ही मलिन झालेली प्रतिमा बदलावी लागेल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.दिवाळी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सोमवारी झाले. बंदीजनांनी हस्तकलेतून तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिवाळीच्या फराळासह आकाशदिवे, पणत्या, कपडे, लाकडी खुर्चा, खेळणी यासह अनेक नक्षीकाम केलेल्या लाकडी फोटो फ्रेम विक्रीसाठी आदींचा समावेश आहे.

यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, आज जरी कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी असले तरी ती हाडामासाची, मन, भावना आणि हृदय असलेली माणसच आहेत. तेव्हा त्यांच्यात वर्तन बदल होईल, या भावना समोर ठेवून कारागृहाने प्रयत्न करायला हवेत. कारागृहात बंदींना वस्तू, फराळ, विविध वस्तू बनविण्यासाठी मिळणारे हे प्रशिक्षण, शिक्षा संपल्यानंतर बाहेर जाऊन उर्वरित आयुष्याच्या पुनर्वसनासाठी उपयुक्त ठरेल. महाराष्ट्रात विविध कारागृहातील बंदीजणांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारात ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर, पोलीस महानिरीक्षक स्वाती शेळके यांच्या प्रोत्साहनातून महाराष्ट्रभर असे उपक्रम सुरू आहेत. अशा प्रयोगांमधून कारागृहात शिक्षा भोगत असलेले बंदीजन आणि समाजामध्ये सलोखा रहावा, असा आमचा प्रयत्न आहे. बंदीजणांनी रात्रंदिवस राबून मोठ्या परिश्रमाने या वस्तू तयार केल्या आहेत. यावेळी उपअधीक्षक साहेबराव आडे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सतीश कदम, सोमनाथ मस्के, चंद्रशेखर देवकर, कारखाना व्यवस्थापक शैला वाघ, कारखाना तुरुंग अधिकारी प्रवीण आंधेकर, अविनाश भोई, विठ्ठल शिंदे, प्रा.मधुकर पाटील, कोल्हापूर बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले आदी उपस्थित होते.

विक्री व प्रदर्शन 19 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार
दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचे विक्रीचे हे प्रदर्शन 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. कळंबा कारागृह आवारात भरवण्यात आलेल्या या विक्री प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी कारागृह प्रशासनाने केले आहे.

 

 

Advertisement
Tags :
#kalambakaragruhkolhapurtarunbharat
Next Article