महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव येथील ‘प्रयास’ संस्थेकडून मलप्रभा नदीची स्वच्छता मोहीम

10:03 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : बेळगाव-अनगोळ येथील ‘प्रयास’ या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून खानापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या मलप्रभा नदीची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रयास संस्थेच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता. मलप्रभा नदीपात्रात अस्ताव्यस्त पडलेले निर्माल्य, कचरा, प्लास्टिक एकत्र करून तो जाळण्यात आला. संस्थेच्या पदाधिकारी सपना विक्रम पाटील तसेच संस्थेचे अनिल कुलकर्णी म्हणाले की, प्रयास संस्थेने या अगोदर हब्बनहट्टी, असोगा, येथील नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबविली आहे. आजपासून आम्ही खानापूर येथील मलप्रभा नदीची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक रविवारी आपण ही स्वच्छता मोहीम राबवत असतो. ज्या सामाजिक संघटना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना यामध्ये भाग घ्यावयाचा आहे. तसेच पावसाला सुरुवात होईपर्यंत, हब्बनहट्टी, असोगा व खानापूर या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबविण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. या स्वच्छता मोहिमेत प्रयास संस्थेच्या सपना पाटील, अनिता कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, अक्षय कुलकर्णी, विक्रम पाटील, नंदा गरगट्टी, पूजा जोशी, अमर जोशी, यश गरगट्टी, विनायक देशपांडे, केशव कुलकर्णी, विशाल सोमनाचे, अव्ययान कुलकर्णी, वाणी जोशी, नगरसेविका व बांधकाम कमिटी चेअरमन बेळगाव महानगरपालिका, नैतिक सोमनाचे, अनंत कुलकर्णी, स्नेहल हेमगिरे, विनय बेटगेरी व इतर कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article