Malkapur Murder | मलकापूर हादरलं! किरकोळ वादातून भावानेच केली मोठ्या भावाची हत्या
मलकापूर येथे परप्रांतीय कामगाराचा त्याच्याच भावाकडून खून
शाहूवाडी -मलकापूर शहरात एका इमारतीच्या बांधकामावर काम करत असलेल्या परप्रांतीय नरेंद्र सिदार वय 40 याचा त्याच्याच छोट्या भावाने खून केल्याची घटना घडली .मात्र पोलिसांची सतर्कता व नागरिकांची सावधानता यामुळे खून करणाऱ्या संशयित भावास काही तासातच पोलिसांच्या सह नागरिकांनी ताब्यात घेतले .
घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर शहरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे . या ठिकाणी नरेंद्र सिदार व त्याचा भाऊ या दोघांच्यात काही वाद झाल्याची चर्चा समोर आली त्यातून दोघांच्या झटापट झाली यातच नरेंद्र सिदार याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे .मात्र सदर प्रकरणी मयत नरेंद्र सिदार याचा छोटा भाऊ हा घटनास्थळापासून पसार झाला होता .
अधिक शोध घेतला असता पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या सह शाहूवाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांच्या सह उपनगराध्यक्ष दिलीप पाटील ,शंतनू कोठावळे ,सुरेश बोरगे ,किरण लगारे ,विनायक विभुते ,प्रताप भोसले यांनी शाळी नदी नजीक संशयित आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले .