For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मलकापूर नगर परिषद : जनसुराज्य–भाजप–दलित महासंघाची सत्ता कायम

03:54 PM Dec 21, 2025 IST | NEETA POTDAR
मलकापूर नगर परिषद   जनसुराज्य–भाजप–दलित महासंघाची सत्ता कायम
Advertisement

                       नगराध्यक्ष पदावर रश्मी कोठावळेंची विजयी मुसंडी

Advertisement

 शाहूवाडी : मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत जनसुराज्यशक्ती पक्षाच्या रश्मी कोठावळे ,यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार माया पाटील यांचा पराभव करत 485 मतांनी विजय मिळवला . आणि पुन्हा एकदा मलकापूर नगर परिषदेवर जनसुराज्य , भाजप व दलित महासंघाने पुन्हा एकदा आपली सत्ता आणली .  विरोधी महाविकास आघाडीला सात जागांवर विजय मिळवता आला . तर एक अपक्ष रविराज कोकरे देसाई  यांनी देखील विजय साकारला आहे .

    मलकापूर नगर परिषदेच्या सभागृहात सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश लवे यांच्या प्रमुख उपस्थितीत  मतमोजणीला सुरुवात झाली .पहिल्या फेरीमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्या समान जागा विजय झाल्या होत्या . तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रश्मी कोठावळे यांना 44 मताची आघाडी मिळाली होती .

Advertisement

मलकापूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत झाली होती . यामुळे या वेळच्या निवडणुकीला चांगलीच रंगत आली . मात्र सत्ताधारी जनसुराज्य , भाजप व दलित महासंघ आघाडीने आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे . अकरा जागावर जनसुराज्य , एक जागेवर भाजप , तर सात जागावर उबाठा गट आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाले .

मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत जनसुराज्यशक्ती पक्षाच्या रश्मी कोठावळे ,यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार माया पाटील यांचा पराभव करत 485 मतांनी विजय मिळवला . आणि पुन्हा एकदा मलकापूर नगर परिषदेवर जनसुराज्य , भाजप व दलित महासंघाने  आपली सत्ता आणली .  विरोधी महाविकास आघाडीला सात जागांवर विजय मिळवता आला . तर एक अपक्ष रविराज कोकरे देसाई  यांनी देखील विजय साकारला आहे .     

 मलकापूर नगर परिषदेच्या सभागृहात सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश लवे यांच्या प्रमुख उपस्थितीत  मतमोजणीला सुरुवात झाली .पहिल्या फेरीमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्या समान जागा विजय झाल्या होत्या . तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रश्मी कोठावळे यांना 44 मताची आघाडी मिळाली होती .

मलकापूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत झाली होती . यामुळे या वेळच्या निवडणुकीला चांगलीच रंगत आली . मात्र सत्ताधारी जनसुराज्य , भाजप व दलित महासंघ आघाडीने आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे . अकरा जागावर जनसुराज्य , एक जागेवर भाजप , तर सात जागावर उबाठा गट आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाले . 
           
दिर भावजय सभागृहात 
प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार रविराज नानासो कोकरे देसाई विजयी झाले .तर प्रभाग 9 मधून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या श्रीमती गिरीजा प्रतापसिंह कोकरे देसाई या विजयी झाल्या . या मुळे दिर भावजय यांचा सभागृहात प्रवेश .
             
प्रमुखाना पराभवाचा धक्का 
या वेळच्या निवडणुकीत अतिशय चुरस निर्माण झाली होती . यामुळे प्रमुखांना पराभवाचा धक्का बसला यामध्ये माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे यांना प्रभाग क्रमांक तीन मधून पराभवाच्या धक्का बसला

Advertisement
Tags :

.