कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माळजाई मंदिर व परिसराचा होणार कायापालट

02:11 PM Sep 16, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

फलटण :

Advertisement

शहर व तालुक्यातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेले पुरातन माळजाई देवी मंदिर व या मंदिराच्या परिसरात असणाऱ्या व दुरावस्था झालेल्या सार्वजनिक उद्यानाचा कायापालट करण्याचे काम सुरु आहे. हे काम प्रतिथयश बांधकाम व्यावसाईक प्रमोद निंबाळकर यांच्या पुढाकाराने व लायन्स क्लब आणि अन्य सेवाभावी संस्था व शहरवासीयांच्या संयुक्त सहभागाने हे कार्य सुरु आहे.

Advertisement

लवकरच या परिसरात भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील लोक यांचा वावर व उद्यानात चिमुकल्यांचा किलबिलाट पुन्हा पाहण्यास व ऐकण्यास मिळणार आहे. माळजाई मंदिर परिसर प्रत्येकाचे आवडीचे ठिकाण आहे. यापूर्वी येथे दिवस-रात्र शालेय मुलांची अभ्यासासाठी गर्दी असायची. ज्येष्ठ नागरिक, महिला दररोज सायंकाळी येथे येऊन काही काळ निसर्ग सानिध्यात विश्रांती घेत असत. ग्रामीण भागातून शासकीय कार्यालय अथवा न्यायालयीन कामकाजासाठी येणारी मंडळी आपल्या सोबत आणलेली शिदोरी येथे बसून खात. या मंदिराच्या प्रशस्त मंडपात अथवा येथील वनराईच्या सानिध्यात शहर, तालुक्यातील विविध कामगार संघटना, शेतकरी संघटना, पोलीस पाटील संघटना, महिला संघटना यांच्या बैठकासह अन्य छोट्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे हे ठिकाण बनले होते. येथे पिण्याच्या पाण्याची व्यवरथा केली होती. मात्र, या उद्यान व परिसराकडे मोठे दुर्लक्ष झाल्याने दुरावस्था झाली होती.

लायन्स क्लब फलटण अंतर्गत माळजाई उद्यान समितीचे अध्यक्ष या नात्याने प्रमोद निंबाळकर यांनी आगामी नवरात्र उत्सवापूर्वी माळजाई उद्यानाचे व येथील पुरातन माळजाई मंदिर, भगवान शिव मंदिर आणि परिसराचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. याकामी त्यांना लायन्स क्लबसह विविध सामाजिक संस्था संघटना आणि शहरवासीयांचे सक्रिय सहाय्य लाभत आहे. याकामी बांधकाम व्यावसायिक महेशशेठ गरवालीया, सगुणामताचे संचालक दिलीप शिंदे, लायन्स क्लबचे विद्यमान अध्यक्ष महेश साळुंखे, विजयराव लोंढे-पाटील, आर्किटेक्ट स्वीकार मेहता आदी प्रमोद निंबाळकर यांच्या समवेत रवतः उभे राहुन दुरुस्ती व सुशोभीकरण काम करुन घेत आहेत.

माळजाई उद्यानालगत असलेल्या मुधोजी क्लब जुन्या जीर्ण इमारतीच्या जागी क्लबच्या कार्यालयासह विविध इनडोअर गेम्स, बैठक हॉल वगैरे प्रशस्त देखणी दुमजली वास्तू उभारण्यात येत असून समोर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारुन त्या परिसराचे सुशोभीकरण केल्याने व या परिसरात असलेल्या संस्थानकालीन अधिकार गृह या देखण्या प्रशस्त वास्तूमध्ये असलेल्या शासकीय कार्यालय व त्यासमोर असलेल्या श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे हा परिसर सुशोभित देखणा व आकर्षक होणार आहे. पुरातन माळजाई मंदिर व परिसराला नव संजीवनी मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

मंदिरासह परिसराची स्वच्छता करुन डांबरीकरण करणे, वृक्षांची संख्या वाढवणे, पुरातन माळजाई मंदिर कलशासह मंदिराची रंगरंगोटी करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अधिक सक्षम करणे, परिसरात नवीन फरशी बराविणे, जुन्या कट्टे व तत्सम बांधकामांची दुरुस्ती याला प्राधान्य देणे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article