विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास मळगाव ग्रामस्थांचा 'महावितरण'ला मदतीचा हात
न्हावेली / वार्ताहर
गेले दोन दिवस सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मळगाव - वेत्येरोड येथील जांभळीचे गाळ परीसरात विद्युत पोल उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. दोन दिवस गावात वीज नसल्याने ग्रामस्थांना समस्यांना सामोरे जावे लागले.आज महावितरणचे सावंतवाडी ग्रामीण अभियंता श्री.खांडेकर यांच्याशी तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री.संजय धुरी यांनी फोनवरुन संपर्क करत तातडीने लाईनमन पाठविण्यासाठी विनंती केली, गावात महावितरणचे दोन कर्मचारी कार्यरत असून विद्युत पुरवठा तातडीने सुरळीत होण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत महावितरण कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देत सर्व यंञसामग्री गोळा करून आडवा झालेला विद्युत पोल उभा करीत वीजपुरवठा सुरू केला. यावेळी मळगाव चे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.संजय धुरी, श्री.एकनाथ गावडे, श्री.मंगेश राऊळ, श्री.विलास राऊळ, श्री.मनोज रेडकर, श्री.सुरेश गावडे, श्री.प्रकाश साळगावकर, श्री.इंगळे आदी ग्रामस्थांसह वायरमन श्री.संतोष गावकर, श्री.हळदणकर यांनी भरपावसात विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला.