मळगाव भूतनाथ देवस्थान जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला
02:50 PM Nov 23, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली /वार्ताहर
Advertisement
मळगाव येथील जागृत देवस्थान श्री देव भूतनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळी मंदिरात विविध धार्मिक विधी, अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळपासून देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, तसेच ईठला देवीची ओटी भरणे, देवीला कोंबडा अर्पण करणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ढोलांच्या गजरात तरंगासहीत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री मळगाव येथील दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव ग्रामस्थ व देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement