For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेचे बांधकाम व महावितरण विभागाला निवेदन

मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेचे बांधकाम व महावितरण विभागाला निवेदन
Advertisement

सातार्डा : मळेवाड येथील जकातनाका बाजारपेठ परिसरातील विविध समस्यांकडे संबंधित विभागांचे लक्ष वेधण्यासाठी मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आले.
जकातनाका परिसरातील समस्यांसंदर्भात मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बाजारपेठ परिसरातील धोकादायक अवस्थेतील सर्कल तसेच जीर्ण झालेले विद्युत पुरवठा पोल या गंभीर समस्यांवर चर्चा करण्यात आली. सर्व व्यापारी व दुकानदारांच्या एकमताने सदर समस्यांबाबत संबंधित विभागांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रमाकांत नाईक, उपाध्यक्ष अशोक शिरसाट, सचिव मदन मुरकर, नंदू नाईक व प्रकाश राऊत यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून या समस्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी करून निवेदन सादर केले.
सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजित पाटील तसेच वेंगुर्ले महावितरण कंपनीचे श्री.पेटकर यांनी जकातनाका परिसरातील समस्यांबाबत लवकर निर्णय घेऊन आवश्यक कामे करण्याचे आश्वासन दिले. बाजारपेठेतील नागरिक व व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने समस्यांवर तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यापारी संघटनेने व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.