For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मालदीवचे अध्यक्ष पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार

06:45 AM Oct 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
मालदीवचे अध्यक्ष पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार
Advertisement

भारताच्या चिंता वाढणार : सार्क पुनरुज्जीवनाची मागणी चर्चेत

Advertisement

वृत्तसंस्था, माले

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे 20-22 ऑक्टोबर दरम्यान पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दशकाहून अधिक काळानंतर मालदीवच्या अध्यक्षांचा पाकिस्तान दौरा होत असल्याने या भेटीकडे भारताचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निमंत्रणावरून होणाऱ्या या दौऱ्यावत द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Advertisement

दोन्ही देशांदरम्यान संरक्षण अन् सैन्य सहकार्य करार होण्याची शक्यता आहे. हा करार झाल्यास हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भारतासाठी एक मोठी डोकेदुखी ठरू शकतो.

मुइज्जू आणि शरीफ यांच्यातील चर्चेत आरोग्यसेवा, शिक्षण, पर्यटन, कृषी आणि व्यापार यासारख्या क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय संरक्षण आणि लष्करी सहकार्याबाबत संभाव्य चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. पाकिस्तान-मालदीव बिझनेस फोरमच्या माध्यमातून दोन्ही देशांतील व्यावसायिक संबंधांनाही चालना देण्याचा प्रयत्न होणार आहे.

सार्क पुनरुज्जीवनाचा मुद्दा

दीर्घकाळापासून निष्क्रीय असलेल्या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेला (सार्क) पुन्हा सक्रीय करण्याच्या मुइज्जू यांच्या भूमिकेमुळे प्रादेशिक राजकारणात हा मुद्दा चर्चेत आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे सार्कच्या कामकाजाला अडथळे आले आहेत. त्यामुळे या संघटनेच्या पुनज्जीवनासाठी होणाऱ्या प्रयत्नांना कितपत यश मिळते, याकडे लक्ष असेल.

भारतासाठी धोरणात्मक महत्त्व

हिंदी महासागरातील मालदीवचे स्थान भारताच्या सागरी सुरक्षा आणि प्रादेशिक धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पाकिस्तानसोबत मालदीवचे संरक्षण संबंध वाढल्यास भारताला या घडामोडींचे धोरणात्मक मूल्यमापन करावे लागेल. दरम्यान मालदीवच्या आर्थिक स्थैर्यासाठी भारताने सहकार्य केले आहे. त्यामध्ये 3,000 कोटी रुपयांच्या चलन अदलाबदल सुविधेच्या मुदतवाढीचा समावेश आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबतचे संबंध वाढविण्याबरोबरच भारताशी आर्थिक संबंध टिकविण्याचे मालदीवसमोरील आव्हानही महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.