महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

06:31 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पीव्ही सिंधू जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज

Advertisement

वृत्तसंस्था/ कौलालंपूर

Advertisement

विश्वबॅडमिंटन फेडरेशनच्या मलेशिया मास्टर्स पुरुष आणि महिलांच्या सुपर 500 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी आपला जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी सज्ज झाली आहे.

पीव्ही सिंधू ही माजी विश्वविजेती असून तिने यापूर्वी झालेल्या उबेर चषक तसेच थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला नव्हता. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सर्किटमध्ये ती मलेशियन बॅडमिंटन स्पर्धेत आपले पुनरागमन करीत आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात सिंधूच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि तिला या दुखापतीने चांगलेच दमविले होते. या दुखापतीमुळे 28 वर्षीय सिंधूला आपला फॉर्म राखता आला नाही. सिंधू ही भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू आहे. 2024 च्या बॅडमिंटन हंगामामध्ये तिने सहा स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शविला असून त्यापैकी दोन स्पर्धांमध्ये तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. सिंधूने यापूर्वी म्हणजे 2022 साली सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद मिळविले होते. सिंधूचे हे शेवटचे जेतेपद असून त्यानंतर तिला आतापर्यंत एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. गेल्या वर्षी झालेल्या स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचे जेतेपद थोडक्यात हुकले होते. तिला अंतिम सामन्यात हार पत्करावी लागल्याने ती उपविजेती ठरली होती. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविताना तिच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती.

मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा सलामीचा सामना स्कॉटलंडच्या  किर्स्टी गिल्मरशी होणार आहे. या स्पर्धेत जागतीक क्षेत्रातील अव्वल बॅडमिंटनपटू अॅन सी यंग, चेन युई फेई, अॅकेनी यामागुची आणि कॅरोलिना मॅरिन सहभागी होणार नाहीत. सिंधूला प्रकाश पदुकोनकडून अलिकडच्या काही दिवसांमध्ये बहुमोल मार्गदर्शन मिळाले आहे. मलेशियन स्पर्धेत अस्मिता छलिया, आकर्षी कास्यंप, मालविका बनसूद हे भारतीय महिला बॅडमिंटनपटू चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करतील. भारताची नवोदित महिला बॅडमिंटनपटू अस्मिता छलियाने अलिकडच्या काही सामन्यांमध्ये आपल्या दर्जेदार खेळाचे दर्शन घडविले आहे. पुरूष एकेरीत किरण जॉर्ज हा एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू या स्पर्धेत सहभागी होत आहे. त्याचा सलामीचा सामना जपानच्या ओबायशी बरोबर होणार आहे. अलिकडेच थायलंड बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद मिळविणाऱ्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीने या स्पर्धेत सहभागी न होण्याचे ठरविले आहे. त्यांच्या गैरहजेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि साई प्रतिक भारताचे प्रतिनिधीत्व करतील. मिश्र दुहेरीत बी. सुमित रे•ाr व एन. सिक्की रे•ाr तसेच सतिशकुमार करुणाकरण व आद्या वरियात भाग घेत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article