मलेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
लक्ष्य सेन आणि पी. व्ही. सिंधू या अनुभवी खेळाडूंसह भारतीय शटलर्स आज मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या 14 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर्सची बक्षिसे असलेल्या मलेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडूंविऊद्ध लढताना वर्षाची जोरदार सुऊवात करण्यास उत्सुक असतील.
भारतीय बॅडमिंटन जगताने दुखापती आणि उच्च स्तरावरील कामगिरीत सातत्याचा अभाव यामुळे 2025 मध्ये कठीण काळ अनुभवला. आता लवकर प्रभाव पाडणे आणि दिल्लीत पुढील आठवड्यात होणाऱ्या इंडिया ओपन सुपर 750 स्पर्धेसाठी तयारी करणे यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. 2021 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लक्ष्यने गेल्या हंगामात चमकदार केली. त्याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 मध्ये विजेतेपद पटकावले. हाँगकाँग ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचलेला अल्मोडाचा हा 24 वर्षीय खेळाडू सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहविऊद्ध सलामीला उतरताना तीच गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
तऊण आयुष शेट्टीनेही अमेरिकन ओपन सुपर 300 जिंकून आशादायक कामगिरी केली आणि पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेता मलेशियाचा ली झी जियाविऊद्ध खेळताना सातत्याच्या समस्या सोडवण्याचा तो प्रयत्न करेल. दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती सिंधूला फिटनेसच्या चिंता आणि खराब फॉर्ममुळे कठीण काळातून जावे लागले आहे. पायाच्या दुखापतीतून सावरताना ऑक्टोबरपासून स्पर्धांना मुकलेली ही माजी विश्वविजेती चिनी तैपेईच्या सुंग शुओ युनविऊद्ध तिच्या मोहिमेची सुऊवात करताना सर्वोत्तम प्रदर्शन पुन्हा घडविण्यास उत्सुक असेल. ओडिशा ओपनच्या दुसऱ्या जेतेपदाचा समावेश राहिलेल्या हंगामात चमकदार कामगिरी केल्यानंतर उन्नती हु•ा आता टोकियो ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेती आणि चौथी मानांकित चीनची चेन यू फी हिचा सामना करणार आहे.
डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर परतणारी मालविका बनसोड ही तिची मोहीम सातव्या मानांकित थायलंडची रत्चानोक इंटेनॉन हिच्याविऊद्ध सुरू करेल. गेल्या वर्षी हंगामाच्या अखेरच्या वर्ल्ड टूर फायनल्सच्या उपांत्य फेरीत पोहोचलेली पहिली भारतीय पुऊष जोडी बनल्यानंतर सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांच्यावरही लक्ष केंद्रीत असेल. ही माजी जागतिक अव्वल जोडी 2025 मध्ये भारताची सर्वांत सातत्यपूर्ण जोडी राहिली. त्यांनी हाँगकाँग ओपन आणि चायना मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला तसेच जागतिक स्पर्धेत दुसरे कांस्यपदक पटकावले आणि अनेक स्पर्धांत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. होती. आशियाई खेळांतील विजेत्या चिनी तैपेईच्या ली झे-हुई आणि यांग पो-ह्सुआन यांच्याविऊद्धच्या सामन्याने ते मोहिमेची सुरुवात करतील. महिला दुहेरीत खांद्याच्या दुखापतीतून परतलेली गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली ही जोडी इंडोनेशियाच्या फेब्रियाना द्विपुजी कुसुमा आणि मेलिसा ट्रायस पुस्पितासरी यांच्याशी सलामीच्या लढतीत लढेल.