'मालविका मोहनन'चे तेलगू सिनेमात पदार्पण
'द राजा साहब' या चित्रपटाद्वारे प्रभाससह शेअर करणार स्क्रीन
दिल्ली
प्रभाससोबत काम करणे हे माझ्यासाठी एक माईल स्टोन सारखे आहे. प्रभासची त्याच्या भूमिकांप्रती असलेले डेडीकेशन आणि ऊर्जा हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याचा आनंद खूप खास आहे अशी प्रतिक्रियी अभिनेत्री मालविका मोहनन हिने एका मुलाखतीद्वारे दिली.
मालविका मोहनन प्रभासच्या ‘द राजा साहब’ या चित्रपटाद्वारे तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिने एका खास मुलाखतीत या चित्रपटाबद्दल, भूमिकांच्या निवडीबद्दल आणि तिच्या कारकीर्दीत शिकलेल्या महत्त्वाच्या धड्यांबद्दल मनमोकळा संवाद साधला.
या सिनेमाद्वारे मालविका हॉरर-कॉमेडी या नव्या प्रकारात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पुढे ती म्हणाली, द राजा साहब हा एक अतिशय वेगळा प्रोजेक्ट आहे. भय-हास्य हा प्रकारात मी यापूर्वी कधीही काम केलेले नाही. त्यामुळे तो मला कथानक आकर्षक वाटले. रहस्य आणि विनोदाचा अनोखा संगम या भूमिकेत आहे, त्यामुळे प्रेक्षकांसाठीही हा प्रवास नक्कीच मनोरंजक ठरेल.
‘द राजा साहब’ या चित्रपटात प्रभाससोबत संजय दत्त, अनुपम खेर, वरलक्ष्मी सरथकुमार, योगी बाबू आणि जिशू सेनगुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मालविका मोहनन ही तमिळ आणि मल्याळी सिनेमा क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कोरीओग्राफर के यु मोहनन यांची कन्या आहे. पट्टम पोले या चित्रपटातून २०१३ मध्ये तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.