महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘युध्रा’मध्ये मालविका मोहनन

06:15 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिद्धांत चतुर्वेदीसोबत जमणार जोडी

Advertisement

सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन यांच्या ‘युध्रा’ चित्रपटाचे पोस्टर निर्मात्यांनी सादर केले आहे. या पोस्टरमध्ये रक्ताने माखलेल्या सिद्धांतचा अत्यंत इंटेंस लुक दिसून येत आहे. तर मालविका ही दाक्षिणात्य अभिनेत्री या चित्रपटात दिसून येणार असल्याने तिचे चाहते उत्सुक झाले आहेत.

Advertisement

सिद्धांतसोबतचा माझा हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांत याचा ट्रेलर सादर करण्यात येईल. युध्रामधील माझी भूमिका अत्यंत वेगळी आहे. एक कलाकार म्हणून मला वैविध्यपूर्ण भूमिका साकारणे आवडत असल्याचे मालविकाने म्हटले आहे.

युध्रा हा चित्रपट एक्सेल एंटरटेन्मेंटकडून निर्माण करण्यात आला आहे. रवि उदयवार यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कहाणी श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे. तर या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांनी गीतलेखन केले आहे.

मालविका याचबरोबर आगामी काळात प्रभाससोबत राजा साब या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाद्वारे ती तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तर सिद्धांत हा धडक 2 या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तृप्ति डिमरी ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article