विजय सेतुपतिच्या चित्रपटात मालविका
प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक त्यागराजन कुमारराजा यांनी स्वत:चा आगामी चित्रपट ‘पॉकेट नॉवेल“ची घोषणा केली आहे. या चित्रपटात विजय सेतुपति मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. निर्मात्यांनी आता याचे पोस्टर जारी केले असून यात विजयचा निम्मा चेहरा दिसून येत आहे. तर पार्श्वभूमीमध्ये पोस्टरचा रंग लाल असुन यामुळे हे पोस्टर अधिक इंटेंस वाटत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांतील यातील कलाकारांविषयीही माहिती दिली आहे. या चित्रपटात विजय सेतुपतिसोबत मालविका मोहनन आणि राज बी. शेट्टी काम करणार आहेत. प्रॉडक्शन कंपनी टायलर डर्डन अँड किंग फिस्टने सोशल मीडियावर याचे पोस्टर जारी केले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाल्याची माहिती देखील देण्यात आली.
पॉकेट नॉवेल चित्रपटाला इलैयाराजा यांचे संगीत लाभणार आहे. चित्रपटाचे सिनमॅटोग्रॉफीची जबाबदारी नीरव शाह सांभाळत आहेत. या चित्रपटाची कथा आणि पटकथा एंड्य्रू लुईस यांनी लिहिली आहे. तर गीतलेखन युग भारती यांनी केले आहे. विजयच्या या चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.