नख सजविण्याच्या कलेतून मोठी कमाई
व्हिएतनाममधून येत दुबईत उभा केला स्वत:चा बिझनेस
एक 32 वर्षीय महिला दर महिन्याला 10 लाख रुपये कमाविते, तेव्हा बहुधा तुमच्या मनात डॉक्टर, इंजिनियर किंवा एखाद्या मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्याचे चित्र उभे राहिल. परंतु जर हीच कमाई नेल आर्टिस्ट करत असेल तर विश्वास ठेवणे अवघड ठरेल. ही कहाणी केवळ एका महिलेच्या मेहनतीची नाही, तर त्या व्यवस्थेचीही आहे, जेथे कौशल्याला योग्य मूल्य मिळते.
ही कहाणी 32 वर्षीय गुयेन फुओंग आन्हची असून तिला लोक ‘फुल्लाह’ नावाने ओळखतात. व्हिएतनाम येथून दुबईत पोहोचलेल्या फुल्लाहकडे कुठलीच मोठी पदवी नव्हती. तिच्या हातात केवळ नखांना सुंदर करण्याचे कौशल्य होते. तिने याच कौशल्याला स्वत:चा पेशा करत दुबईतील प्रसिद्ध नेल आर्टिस्ट होण्याची कामगिरी केली आहे. तिची मासिक कमाई आता 30 हजार ते 40 हजार दिरहम म्हणजेच 7-10 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
फुल्लाह सुमारे 6 वर्षांपूर्वी उज्ज्वल भविष्याच्या शोधात व्हिएतनाम येथून दुबईत दाखल झाली होती. प्रारंभी तिने छोट्याशा सलूनमध्sय दोन वर्षांच्या कंत्राटावर काम केले. त्यावेळी तिला दर महिन्याला केवळ 3500 दिरहम म्हणजेच सुमारे 80 हजार रुपये वेतन मिळायचे. कंत्राट संपताच तिने नोकरी सोडली आणि फ्रीलान्स नेल आर्टिस्ट म्हणून काम सुरू पेले. तिने सुटी न घेता मेहनत केली, हळूहळू तिच्या ग्राहकांची संख्या वाढत गेली आणि तिची कमाई अनेक पट वाढली.
12 वर्षांपासून नेल आर्ट
फुल्लाह मागील 12 वर्षांपासून 3डी ने आर्टमध्ये प्राविण्य मिळवून आहे. ती फुलं, प्राणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन असलेले नेट आर्ट साकारते. ग्राहकांना युनिक डिझाइन मिळावे, परंतु किंमत अधिक नसावी असा तिचा प्रयत्न राहतो. याचमुळे खासकरून युवा ग्राहकांदरम्यान तिची लोकप्रियता वेगाने वाढली आहे.
स्वत:चे सलून
जून महिन्यात फुल्लाहने दुबईच्या जुमेराह विलेज सर्कलमध्ये ‘ब्युटी बाय फुल्लाह’ नावाने स्वत:चा सलून सुरू केला. सध्या ती स्वत:च्या बिझनेसमधून स्वत: कुठलेच वेतन घेत नाही. प्रारंभिक काळात मी पूर्ण कमाई पुन्हा बिझनेसमध्ये गुंतवत आहे. पुढील काही महिन्यांमध्ये सलून स्थिरसावर होईल आणि मग पुन्हा पूर्वीसारखी कमाई प्राप्त करू शकेन अशी अपेक्षा असल्याचे तिचे सांगणे आहे.
कमाई लाखेंमध्ये, खर्च अत्यंत कमी
इतकी चांगली कमाई असूनही फुल्लाहची जीवनशैली अत्यंत साधेपणाने युक्त आहसे. प्रारंभी ती एका मैत्रिणीसोबत स्टुडियो रुम शेअर करायची. आता ती एका छोट्याशा स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये राहते. तिचा दर महिन्याचा एकूण खर्च जवळपास 6 हजार दिरहम आहे, ज्यातील जवळपास 1 हजार दिरहम खाण्यावर आणि 5 हजार दिरहम भाडे तसेच पेट्रोलवर खर्च होतात. फुल्लाह दर महिन्याला 5 हजार दिरहम व्हिएतनाममध्ये पाठवून गुंतवणूकही करते. तिने तेथे दोन घरं खरेदी केली आहेत. कमाई जितकी आवश्यक आहे, तितकेच भविष्यासाठी गुंतवणूक करणे देखील असे तिचे सांगणे आहे.
20 वर्षांनी निवृत्तीचे स्वप्न
फुल्लाहचे लक्ष्य केवळ अधिक कमाई करणे नाही. पुढील 20 वर्षांमध्ये दुबईसोबत अबूधाबी, फुजैराह आणि इतर अमिरातमध्येही स्वत:च्या सलूनच्या शाखा सुरू करण्याची तिची इच्छा आहे. माझ्याशिवाय देखील चालू शकेल असा बिझनेस तयार करण्याचे माझे स्वप्न आहे. वयाच्या 50 व्या वर्षी मी निवृत्त होऊ इच्छितो. यानंतर मी व्हिएतनाममध्ये एक फार्म खरेदी करत तेथेच राहू इच्छिते. प्राण्यांदरम्यान राहण्याचे आणि भाज्या उगवून निसर्गाच्या सान्निध्यात जगण्याचे माझे स्वप्न आहे. माझ्यासाठी खरे यश केवळ पैसे कमाविणे नाही, तर वेळीच स्वत:च्या अटींवर जीवन जगणे असल्याचे फुल्लाहचे सांगणे आहे.