For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विचारपूर्वक विधाने करा !

06:20 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
विचारपूर्वक विधाने करा
Advertisement

निवडणूक आयोगाचा काँग्रेस अध्यक्षांना सल्ला

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी मल्लिकार्जुन खर्गे यांना फटकारले. आपल्या विधानांमुळे निष्पक्ष निवडणुकांना बाधा येते, असे आयोगाने म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान टक्केवारीच्या आकडेवारीबाबत खर्गे यांनी संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले होते. अशा विधानांचा लोकशाही प्रक्रियेतील मतदारांच्या सहभागावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे आयोगाने म्हटले आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत तिन्ही टप्प्यांमध्ये कमी मतदान झाले. तर निवडणूक आयोगानेही मतदानाची आकडेवारी उशिरा जाहीर केली. याच मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहिण्याबरोबरच निवडणूक आयोगाच्या कृतीबाबत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने यावर आक्षेप नोंदवत खर्गे यांना विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला आहे. आपले वक्तव्य निष्पक्ष लोकसभा निवडणुकीला बाधा आणू शकते. त्यामुळे त्यांनी अशी बेजबाबदार विधाने करू नयेत, अशी तंबी  निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना दिली आहे.

काँग्रेस अध्यक्षांनी इंडिया आघाडीतील पक्षांना पत्र लिहून थेट मतदानाच्या आकडेवारीवरच प्रश्न उपस्थित केला होता. आघाडीतील सर्व पक्षांना मतदानाच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करण्याचे आवाहन करत संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करणे आपले कर्तव्य असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.

मतदानादरम्यान आयोगाच्या अॅपवर सर्व डेटा अपलोड होत असतो. तसेच मतदानाच्या टक्केवारीचे लाइव्ह अपडेट्सही सर्वसामान्यांना दिले जातात. त्यामुळे संभ्रम निर्माण करणारी विधाने करणे टाळावे, असे निवडणूक आयोगाने सांगितले. तसेच अंतिम मतदानाची आकडेवारी मतदानाच्या दिवसापेक्षा नेहमीच जास्त असते. 2019 च्या निवडणुकीपासून आम्ही आकडेवारी मेट्रिक्सवर अपडेट करत आहोत. आम्ही डेटा गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये काहीही चुकीचे केलेले नाही, असे आयोगाने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.