For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकरी सहकारी संघाची निवडणुक बिनविरोध करा ; सुरेश देसाई यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

03:33 PM Dec 16, 2023 IST | Kalyani Amanagi
शेतकरी सहकारी संघाची निवडणुक बिनविरोध करा   सुरेश देसाई यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन
Advertisement

निवडणुकीचा खर्च संघाला न पेलवणारा

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

शेतकरी सहकारी संघाची आर्थिकस्थिती बिकट असून संघाच्या निवडणुकीसाठी येणारा 60 ते 70 लाख रुपयांचा खर्च संघ प्रशासनाला न परवडणारा आहे. त्यामुळे शेतकरी संघाची होवू घातलेली निवडणुक जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी बिनविरोध करावी, असे आवाहन संघाच्या अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले.

Advertisement

अध्यक्ष देसाई म्हणाले, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक यांनी शेतकरी संघाच्या अशासकीय मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. गेली वर्षभर संघाचा गाडा चालविताना आर्थिक वर्षात संघाला तोट्यातून फायद्यात आणले. यासाठी जिल्हा बँकेने केलेले अर्थसहाय्य मोलाचे ठरले. संघाची हि फायद्यातील वाटचाल पाहता संघाला गतवैभव प्राप्त होईल अशी आशा कर्मचाऱ्यांमध्येही निर्माण झाली असल्याचे देसाई यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, संघाची निवडणुक प्रक्रीया सोमवार 18 रोजीपासून सुरु होत आहे. निवडणुक लागल्यास या प्रक्रीयेसाठी सुमारे 60 ते 70 लाख रुपये खर्च येणार आहे. संघाची सध्याची बिकट परिस्थिती पाहता हा खर्च संघाला न पेलवणारा आले. त्यामुळे हा खर्च टाळण्यासाठी निवडणुक बिनविरोध होणे गरजेचे आहे. निवडणुक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेवून विनंती केली आहे. संघाची आर्थिकस्थिती पाहता नेतेमंडळी निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा अध्यक्ष देसाई यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला कार्यकारी संचालक सचिन सरनोबत उपस्थित होते.

संघ योग्य व्यक्तींच्या हातात जाणे गरजेचे

शेतकरी संघाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संघ योग्य व्यक्तींच्या हातात जाणे गरजेचे आहे. पारदर्शी कारभार करणारे संचालक संघामध्ये आले तर कर्मचारीही शिस्तीने काम करतील. यामुळे कार्वे शाखेत झालेल्या अपहाराचे प्रकार पुढील काळात थांबतील आणि संघाला नक्की गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

संघ अद्यापही 1.26 कोटी तोट्यात

अशासकीय मंडळाने शेतकरी संघाचा कारभार हातात घेतल्यानंतर गेली वर्षभर संघाचा कारभार काटकसरीने व पारदर्शी केला आहे. त्यामुळे संघ आर्थिक वर्षात 12 लाख रुपयांनी फायद्यात आला. यासाठी संघाच्या कर्मचाऱ्यांचेही मोलाचे योगदान मिळाले. असे असले तरी संघ अद्यापही सुमारे 1 कोटी 26 लाख रुपये तोट्यात आहे. या तोटा भरुन काढण्यासाठी अजून कालावधी लागणार आहे.

खेळत्या भांडवलातूनच निवडणुकीचा खर्च

संघाकडे सध्या निवडणुक खर्चासाठीचा निधीच उपलब्ध नाही आहे. अशा परिस्थितीत कार्वे शाखेत झालेल्या अपहारामध्ये संघाचे सुमारे साठ लाख रुपये अडकून आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत निवडणुक लागल्यास संघाला खेळत्या भांडवलामधूनच निवडणुकीसाठीचा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे संघाची आर्थिक परिस्थिती पाहता सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत निवडणुक बिनविरोध करणे गरजेचे आहे, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.