महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पडिक शेतजमिनीत ‘सोलर फार्म’ करुन पैसे कमवा

01:03 PM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे आवाहन

Advertisement

मडगाव : आपली शेतजमीन पडिक ठेवणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी ‘सोलर फार्म’ उभारून महसूल मिळवण्याचा विचार करावा, असा सल्ला वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिला आहे. धर्मापूर येथे काल मंगळवारी वेळळी मतदारसंघातील कमी दाबाच्या वीजवाहिनीची पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते. सौर उर्जेची साठवण करण्यासाठी एकमेकांशी जोडलेले सौर पॅनेल असलेले जमिनीचे मोठे क्षेत्र म्हणजे सोलर फार्म असे सांगून वीजमंत्र्यांनी 300 ते 400 युनिट वीज वापरणाऱ्या कुटुंबांना पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत मोफत रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले. या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांचे वीज बिल शून्यावर येऊ शकते, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.

Advertisement

मोठ्या प्रमाणात सौरउर्जा निर्माण होईल

पुढे बोलताना ते म्हणाले की, आता लोकांनी सौरउर्जा वापरण्यासाठी पुढे आले पाहिजे. सौरउर्जा निर्माण करण्यासाठी या पॅनेलचा पर्याय निवडण्याची गरज आहे. पंचायती तसेच स्थानिकांनी पुढे येऊन सोलर फार्म उभारण्यासाठी वापरात नसलेली जमीन दाखवावी. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात सौरउर्जा निर्माण होण्यास मदत होईल. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार व्रुझ सिल्वा उपस्थित होते. त्यांनीही आपले विचार मांडले. वेळळी मतदारसंघात कमी दाबाच्या वीजवाहिनीचा शुभारंभ केल्याने या भागाला आता सुरळीत वीजपुरवठा होण्यास मदत होईल. कार्यक्रमाला सरपंच, पंच सदस्य तसेच जिल्हा पंचायत सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अधीक्षक अभियंते राजीव सामंत यांनी सर्वांचे स्वागत केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article