For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संगणक उतारे वितरणासाठी सूचना करा

10:25 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
संगणक उतारे वितरणासाठी सूचना करा
Advertisement

कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतचे तालुका पंचायत अधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. संगणक उताऱ्यांसाठी नागरिकांची मागणी होत असून सदर उतारे त्वरित मिळावे यासाठी ग्राम पंचायत अधिकाऱ्यांना ग्रा. पं. कामासाठीही सवलत द्यावी, अशा मागणीचे निवेदन कंग्राळी खुर्द ग्रा. प. सदस्यांतर्फे ता. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांसह सचिव व इतर कर्मचाऱ्यांनाही नेमणूक करण्यात आले आहे. त्यामुळे विविध कामांसाठी ग्राम पंचायतीला येणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष करून बहुतांश नागरिकांकडून संगणक उताऱ्यांसाठी मागणी वाढली आहे. सध्या यात्रा, लग्नसराई हंगाम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना संगणक उताऱ्याच्या आधारावर बँकांमधून कर्ज काढणे सोयीचे ठरत आहे. यासाठी संगणक उताऱ्यांची मागणी वाढली आहे. ग्राम पंचायतींमध्ये अधिकारी नसल्याने ग्रामस्थांना संगणक उतारे मिळणे कठीण झाले आहे. यासाठी निवडणूक कामातून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना किमान तीन दिवस ग्राम पंचायतीच्या कारभाराकडे लक्ष देण्यास सोय करून द्यावी. यामुळे नागरिकांच्या समस्या दूर होतील. तसेच संगणक उतारे वितरण करण्यास सूचना करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी ग्रा. पं. सदस्य चेतक कांबळे, प्रशांत पाटील, वैजू बेन्नाळकर, राकेश पाटील, उमेश चौगुले, कल्लाप्पा पाटील, सुमन पाटील, अनिता पाटील, पूजा चौगुले आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.