For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेअरमन कोणीही करा, पण महायुतीचा हवा

12:56 PM May 17, 2025 IST | Radhika Patil
चेअरमन कोणीही करा  पण महायुतीचा हवा
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळच्या चेअरमन पदी पुढील वर्षभरासाठी कोणालाही संधी द्या, पण तो संचालक महायुतीचा असला पाहिजे अशी भुमिका जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी घेतली आहे. तर दूसरीकडे गोकुळची सर्व सुत्रे आता महायुतीचे नेते म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या हाती घेतली आहेत. गोकुळचा नवा चेअरमन मंत्री मुश्रीफ ठरवतील तोच असणार आहे. सध्यातरी अजित नरके, नवीद मुश्रीफ यांची नावे चेअरमन पदासाठी चर्चेत आहेत. मात्र गोकुळमध्ये सुरु झालेल्या मविआ आणि महायुतीच्या राजकारणाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी मौन बाळगले आहे. नुतन चेअरमन निवडीबाबत हे नेते काय भुमिका घेणार हे देखिल महत्त्वाचे असणार आहे.

गोकुळच्या राजकारणात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या सुचनेनुसारच चेअरमन अरुण डोंगळे यांनी चेअरमनपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्तक्षेपामुळे गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर देखिल मर्यादा आल्या आहेत. तरीही त्यांनी राजकारणात दिलेला शब्द पाळणे फार महत्त्वाचे असते, असे सांगत चेअरमन अरुण डोंगळे यांना राजीनामा देण्याबाबत सांगितले आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या सूचनेचे डोंगळे कितपत पालन करणार हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.

Advertisement

चेअरमन निवड मंत्री मुश्रीफ करणार गोकुळमधील सत्ताधारी आघाडीतील 17 संचालकांपैकी बहुतांश संचालक हे राज्याच्या राजकारणात महायुतीसोबत असलेल्या नेत्यांचे आहेत. त्यामुळे महायुतीचा चेअरमन हवा असे राजकारण गोकुळमध्ये सुरु झाले आहे. मंत्री हसन मुश्रीफ हे सध्या महायुतीसोबत असून जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन झाला तरी तो मंत्री मुश्रीफ यांनी निवड केलेलाच असणार आहे.

  • डोंगळेंनाच पुन्हा संधी का नवा चेहरा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार चेअरमन पदाचा राजीनामा न दिलेले अरुण डोंगळे यांनाच पुन्हा संधी मिळणार का नवा चेहरा गोकुळला चेअरमन म्हणून मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके हे गोकुळच्या सत्ताधारी आघाडीचे नेते असून ते पक्षीय राजकारणात महायुतीसोबत आहेत. मात्र यापैकी पालकमंत्री आबिटकर, आमदार कोरे, आमदार नरके यांनी गोकुळच्या कारभारात फारसा हस्तक्षेप केलेला नाही. मात्र आमदार नरके यांचे बंधू संचालक अजित नरके हे गोकुळमध्ये सक्रीय आहेत. पालकमंत्री आबिटकर, आमदार कोरे यांच्या गटाला चेअरमन पद मिळण्याची शक्यता कमी आहे. तर मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ हे चेअरमन झाल्यास अप्रत्यक्षरित्या मंत्री मुश्रीफ यांचीच पकड गोकुळवर कायम राहणार आहे. तर आमदार नरके यांचे बंधू अजित नरके यांचा गोकुळच्या कारभारातील सक्रीय सहभाग पाहता त्यांचे नावही चेअरमन म्हणून पुढे येऊ शकते.

  • गोकुळमधील नेते व त्यांचे संचालक :

आमदार सतेज पाटील : विश्वास पाटील, शशीकांत पाटील, बाबासो चौगले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर.

मंत्री हसन मुश्रीफ : नाविद मुश्रीफ, रणजितसिंह पाटील, अरुण डोंगळे.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर : नंदकुमार ढेंगे, अभिजीत तायशेटे.

आमदार विनय कोरे : अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाङ

आमदार चंद्रदीप नरके : अजित नरके, एस. आर. पाटील, सुजित, मिणचेकर.

.वाय. पाटील : प्रा. किसन चौगले.

विरोधी संचालक : बाबासाहेब खाडे, शौमिका महाडिक, डॉ. चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे.

Advertisement
Tags :

.