For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेती अवजारे जीएसटी मुक्त करा

10:19 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेती अवजारे जीएसटी मुक्त करा
Advertisement

संयुक्त किसान मोर्चाची खासदारांकडे मागणी

Advertisement

बेळगाव : देशातील शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यात शेती अवजारे खरेदी करताना 5 ते 18 टक्क्यांपर्यंत जीएसटी भरावा लागतो. यामुळे मूळ किमतीपेक्षा अवजाराची किमत अधिक होते. त्यामुळे केंद्र सरकारने कृषी अवजारे तसेच शेतीवर आधारभूत यंत्रसामुग्री जीएसटीमुक्त करावी, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जगदीश शेट्टर यांनी संसदेत आवाज उठविण्याची मागणी करण्यात आली. विविध प्रकल्प राबविण्यासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन हडपली जात आहे. सुपीक जमिनीऐवजी इतर जमिनीमध्ये शेतकऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊन प्रकल्प राबवावेत. वयोवृद्ध शेतकऱ्यांना वयाच्या साठीनंतर 10 हजार रुपये मासिक पेन्शन सुरू करावी. विद्युत विभागाचे खासगीकरण करू नये. तसेच प्रिपेड व स्मार्ट मीटर बसवू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सिद्धगौडा मोदगी, शिवलिला मिसाळे, शंकर डवरी, मकानदार, चौगुले व इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.