महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बसुर्ते शेतवडीतील रस्ता करा : शेतकऱ्यांची मागणी

10:44 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रामपंचायत पथकाने केली पाहणी : सध्या तात्पुरती सोय : पावसाळ्यानंतर रस्ता करण्याचे आश्वासन

Advertisement

वार्ताहर/उचगाव

Advertisement

बसुर्ते गावालगत असलेल्या शेतवडीत जाणारा महत्त्वाचा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने शेतात कसे जायचे, हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर असून शासनाने तातडीने या रस्त्याची दुऊस्ती करून शेतवडीत ये-जा करण्यासाठी हा रस्ता करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे. बसुर्ते येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळून शेतवडीत रस्ता जातो. या भागात पाणलोट क्षेत्र असल्याने पाण्याचा प्रचंड लोंढा आल्याने शेतवडीतील रस्ता संपूर्ण वाहून गेलेला आहे. सध्या या रस्त्यावरूनच मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये आता ये-जा करताना गैरसोय होत आहे.

गावापासून तीन किलोमीटर आत असलेला हा रस्ता संपूर्ण वाहून गेला आहे. या रस्त्यावर टाकण्यात आलेली माती व खडी संपूर्ण वाहून गेल्याने त्या रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले आहे. बसुर्ते गावच्या शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. शेतवडीच्या वरील संपूर्ण भाग डोंगराळ असल्याने तेथून येणाऱ्या जोरदार पाण्यामुळे संपूर्ण रस्त्यावरील माती वाहून गेली आहे. गावातील शेतकऱ्यांना रोज जनावरांचा चारा आणण्यासाठी या रस्त्यावऊनच ये-जा करावी लागते. परंतु सध्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांची पंचायत झालेली आहे. या मार्गावरून शेतवडीत जनावरांचा चारा आणताना व कामासाठी जाताना जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे.

ग्रामपंचायतकडून रस्त्याची पाहणी

बसुर्ते गावातील शेतकऱ्यांनी वाहून गेलेल्या रस्त्याबाबतची माहिती तातडीने उचगाव ग्रामपंचायतीला देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामपंचायतच्या पाहणी पथकाने बसुर्ते गाव गाठले. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, सदस्य एल. डी. चौगुले, सूरज सुतार, दत्ता बेनके, शशीकांत जाधव व नागरिक व शेतकऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून पावसाळा संपताच रस्त्याची डागडुजी अथवा रस्ता नवीन करण्यात येईल. तोपर्यंत तात्पुरती उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन दिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article