For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur : विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मकरसंक्रांत उत्सव उत्साहात

06:59 PM Jan 11, 2026 IST | NEETA POTDAR
pandharpur   विठ्ठल रूक्मिणी मंदिरात मकरसंक्रांत उत्सव उत्साहात
Advertisement

                                     भाविकांसाठी दर्शन व्यवस्थेत विशेष बदल

Advertisement

पंढरपूर : विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये मकरसंक्रांत उत्सव साजरा करण्यात येत आहे. मकरसंक्रांतीनिमित्त १३ जानेवारी रोजी रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ३ ते ४.३० या वेळेत करण्यात येणार आहे. माता व भगिनींना श्री रूक्मिणी मातेस भोगी करावयाची असेल, त्यांनी मंदिरामध्ये पहाटे ४.३० ते ५.३० या वेळेत करावी. पहाटे ५.३० नंतर रूक्मिणी मातेस पोषाख व अलंकार परिधान करण्यात येतील व सकाळी ६.३० बाजेपर्यंत दर्शन सुरू असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

भाविकांच्या सोईच्या दृष्टीने १३ जानेवारी रोजी विठ्ठलाकडील काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ४.३० ते ५.४५ या वेळेत होऊन, पदस्पर्श दर्शन पहाटे ६ नंतर सुरू करण्यात येणार आहे. १४ जानेवारी रोजी नेहमीच्या वेळेमध्ये मकरसंक्रांती निमित्त रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा झाल्यानंतर श्री रूक्मिणी मातेस कडाअलंकारपरिधान केले नंतर दर्शनसुरू करण्यात येणार आहे. १५ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा नेहमीच्या वेळेत करण्यात येणार आहे. विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व्हावे, याकरीता पुरूष भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरे समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Advertisement

या कालावधीत भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन, दर्शनरांग व्यवस्थापन, कमांडोज नियुक्ती, टोकन दर्शन बुकिंग व्यवस्था बंद, चांगली स्वच्छता व्यवस्था, व्हिआयपी दर्शनावर निर्बंध, पुजेची संख्या कमी करून भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उत्सव मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येत असल्याचे प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.