Solapur Crime : सांगोल्यात मोबाईल शॉपीवर मोठी चोरी; ३.८८ लाखांचा मुद्देमाल गायब
06:09 PM Dec 24, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
सांगोला-मिरज रोडवर मोबाईल दुकानात चोरीची घटना
Advertisement
सांगोला : अज्ञात चोरट्यांने मोबाईल शॉपी दुकानचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करून दुकानातील ३ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे मोबाईल संच चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी सांगोला शहरात उघडकीस आली.
सत्यवान वसंत इंगवले (रा. मेडशिंगी)यांचे सांगोला-मिरज रोडवर मोबाईल दुकान आहे. रविवारी रात्री ९ वा. च्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानावरील पत्रा उचकटलेले दिसून आले.
Advertisement
दुकानाचे निरीक्षण केले असता दुकानातील विविध कंपन्यांचे ३ लाख ८८ हजाराचे मोबाईल चोरून नेल्याबाबत गुन्हा नोंद केला आहे.
Advertisement