For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur | पंढरपुरात चैत्री यात्रेच्या बंदोबस्तात मोठी कारवाई; ८० हजारांचा गांजा आणि कार जप्त

04:45 PM Apr 01, 2026 IST | NEETA POTDAR
pandharpur   पंढरपुरात चैत्री यात्रेच्या बंदोबस्तात मोठी कारवाई  ८० हजारांचा गांजा आणि कार जप्त
Advertisement

                     चैत्री यात्रेच्या तोंडावर अंमली पदार्थांची तस्करी

Advertisement

पंढरपूर - शहरातील सरगम चौक येथे भरधाव वेगाने निघालेल्या कारमधून पोलिसांनी ८० हजार रुपयांचा चार किलो गांजा व गांजाची वाहतूक करणारी कार असा ५ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. कारवाई दरम्यान गाजांची वाहतूक करणाऱ्या एकाला जेरबंद करण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.

उपविभागीय पोलीस अधिकारीप्रशांत डगळे यांनी सांगितले की, चैत्री यात्रेचा बंदोबस्त करीत असताना येथील केबीपी चौकामध्ये एक कार भरधाव जाताना पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर कारचा पाठलाग केल्यानंतर सरगम चौकात कार थांबली. यावेळी कार (एमएच १३ बीएन ४८६८) मध्ये तीन किलो ९०० ग्रॅम गांजा पोलिसांना आढळून आला. यानंतर तत्काळ पोलिसांनी कारचालक माणिक चौगुले (रा. नारायणचिंचोली, ता. पंढरपूर) यास ताब्यात घेतले. कारमध्ये ८० हजार रुपये किंमतीचा गांजा आणि पाच लाख रुपये किमतीची कार असा पाच लाखाची कार ताब्यात घेतली.

Advertisement

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके अजूनही शेतात उभी असताना आलेल्या या पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसासोबत विजांच्या कडकडाटाने परिस्थिती अधिक गंभीर केली. या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी, करडई यासारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Advertisement
Tags :

.