For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime : कोल्हापुरात मोठी कारवाई; ८३ किलो गांजासह एकाला अटक

06:06 PM Jan 29, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   कोल्हापुरात मोठी कारवाई  ८३ किलो गांजासह एकाला अटक
Advertisement

                                 पुण्यातील एकास अटक; २५.८८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Advertisement

कोल्हापूर : राजारामपुरी पोलिसांनी राजाराम तलाव गेटसमोर छापा टाकून अवैध विक्रीसाठी आणलेला तब्बल ८३ किलो १४५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. या कारवाईत २५ लाख ८८ हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी समीर पापा शेख (वय ३४, रा. कात्रज, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. बुधवारी (दि. २८) पहाटे सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठ मार्गावरील राजाराम तलाव गेटसमोर ही कारवाई करण्यात आली.

गोपनीयबातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून आरोपीच्या ताब्यातील चार नायलॉन पिशव्यांमध्ये चिटकपट्टीने गुंडाळलेले ४० पॅकेट्समधील गांजाचा मोठा साठा जप्त केला. या गांजाची किंमत २०.७८ लाख रुपये असून, याशिवाय टेम्पो किंमत ५ लाख रुपये किमतीचा टेम्पो आणि १० हजार रूपये किमतीचे ११ मोबाइल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यातगु.र.नं. ६१/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा, १९८५चे कलम ८ (क) व २० (ब) (ii) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडगर व त्यांच्या पथकाने केली.

Advertisement
Tags :

.