US Israel Iran conflict | अमेरिका-इस्रायल हल्ल्यानंतर विमान वाहतुकीवर मोठा परिणाम; भारतातील ८५० हून अधिक उड्डाणे रद्द
आखाती हवाई क्षेत्र बंद; एअर इंडिया-इंडिगो अडचणीत
नवी दिल्ली -अमेरिका-इस्रायल यांच्याकडून इराणचर झालेल्या हल्ल्यानंतर विमान वाहतूक क्षेत्रावर विपरित परिणाम झाला आहे. बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाढत्या संघर्षामुळे जगभरातील विमान कंपन्यांना उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. भारतातही उड्डाणे रद्द करण्याचे प्रकार दिसून येत आहेत. मात्र, विमान वाहतूक खोळंबल्यामुळे अनेक प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. भारतातून पर्यटनाच्या निमित्ताने विदेशात गेलेले लोक आणि युद्धाच्या भीतीने मायदेशी परतणारे शेकडो लोक परतीच्या प्रतीक्षेत आहेत.
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे मोठे नुकसान झालेल्या भारतीय विमान कंपन्यांना आता जाखाती देशांचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे अडचणी येत आहेत. या घटनेचा आता एअर इंडियापासून इंडिगोपर्यंतच्या कंपन्यांच्या कमाईवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्याहल्ल्यांपासून १ मार्चपर्यंत देशांतर्गत विमान कंपन्यांच्या ८५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
आखाती देशांचे हवाई क्षेत्र बंद केल्याने एक मोठे संकट निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवेसाठी इंडिगो आणि एअर इंडिया या दोन्ही विमान कंपन्यांसाठी उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत आहे. परिणामी, आर्थिक वर्ष २०२६ च्या शेवटच्या तिमाहीत देशांतर्गत विमान कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम स्पष्टपणे दिसून येईल. दोन्ही विमान कंपन्यांनी यापूर्वी तिसऱ्या तिमाहीत तोटा नोंदवला होता.
पाकिस्तान व्यतिरिक्त इराण युद्धामुळे आखाती देशांचेहवाई क्षेत्र बंद केल्याने एअर इंडिया आणि इंडिगोसह इतर भारतीय विमान कंपन्यांच्या कमाईवर लक्षणीय परिणाम होईल, एअर इंडिया, इंडिगो, अकासा आणि स्पाइसजेट यांनी मध्य पूर्वेला जाणारी लांब पल्ल्याच्या आणि आखाती हवाई क्षेत्रातून जाणारी उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. आहे.
विमान वाहतूक नियामक डीजीसीएच्या मते, २८ फेब्रुवारी रोजी ४१० उड्डाणे रद्द करण्यात आली आणि १ मार्च रोजी अंदाजे ४४० उड्डाणे रद्द करण्यात आली. इंडिगो ७ मार्चपर्यंत मध्य पूर्वेला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांसाठी मोफत रद्दीकरण आणि पुनर्नियोजन सुविधा देत आहे.