Kolhapur : इचलकरंजीत मोठी घरफोडी उघडकीस; दोन अट्टल गुन्हेगार अटकेत
पितळी नळ चोरीप्रकरणी ६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी : येथील पंचगंगा फॅक्टरी रोडवरील जलाराम ट्रेडर्स या दुकानात झालेल्या घरफोडीप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. मुकेश गणपती जाधव (वय ३९) आणि उमेश गणपती गोसावी उर्फ जाधव (वय ४३, रा. शाहुनगर, चंदूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल ५ लाख १४ हजार २८६ रुपयांचे पितळी नळ आणि सुमारे दीड लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
किशोर पटेल यांच्या मालकीचे जलाराम ट्रेडर्स हे दुकान डेक्कन चौक ते पंचगंगा फॅक्टरी रोडवर आहे. २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दुकानाच्या मागील बाजूच्या गोडावूनचा पत्रा उचकटलेला आढळून आला. तपास केला असता सुमारे ६ लाख ३६ हजार २०० रुपये किमतीचे विविध कंपनीचे पितळी नळ चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना धर्मराज चौक परिसरात संशयास्पद चार चाकी गाडीतून फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांचे पितळी नळ आणि चोरीत वापरलेली चारचाकी जप्त करण्यात आली.