For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कराचीत शॉपिंग मॉलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग

06:19 AM Jan 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
कराचीत शॉपिंग मॉलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग
Advertisement

तिघांचा होरपळून मृत्यू : 7 जण जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानातील कराची येथील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य सात जण जखमी झाले. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे दिसून आले आहे. आग एका दुकानातून लागल्यानंतर संपूर्ण मॉलमध्ये पसरली. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सिंधचे राज्यपाल कामरान तेसोरी यांनी या घटनेवर चिंता व्यक्त करत अहवाल मागवला.

Advertisement

बचाव पथकांनी लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि बचावकार्यात मदत केली. यादरम्यान परिसरातील विविध हॉस्पिटलनाही सतर्क ठेवण्यात आले होते. सध्या या दुर्घटनेमध्ये होरपळलेल्यांवर इस्पितळात उपचार सुरू आहेत. सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लंजर यांनी बचावकार्यावेळी वाहतूक वळवण्याचे आदेश दिले होते. तसेच या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. या घटनेच्या एक दिवसापूर्वी कराची पोर्ट ट्रस्टमध्ये आग लागून 20 हून अधिक कंटेनर जळून खाक झाले होते. सदर कंटेनरमध्ये इलेक्ट्रिक बॅटरी असल्यामुळे आग प्रचंड भडकली होती.

Advertisement
Tags :

.