For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गुरुवारच्या सत्रात शेअरबाजारात मोठी घसरण

07:00 AM Oct 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुरुवारच्या सत्रात शेअरबाजारात मोठी घसरण
Advertisement

सेन्सेक्स 1045 अंकांनी तर निफ्टी 371 अंकांनी कोसळला, बँक निर्देशांकदेखील दबावात, कच्चे तेल वधारले

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ त्याचप्रमाणे बँकेच्या समभागांमध्ये निर्माण झालेला दबाव, भारतीय शेअर बाजाराला नुकसानीत ढकलण्यात दिसून आला. सेन्सेक्स हजार अंकांनी तर निफ्टी 371 अंकांनी कमकुवत होत बंद झाला. सलग नवव्या आठवड्यामध्ये भारतीय शेअरबाजारात मोठा दबाव पाहायला मिळाला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1045 अंकांनी घसरत 71593 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 371 अंकांनी कोसळत 22231 अंकांवर बंद झाला.

Advertisement

निफ्टी बँक निर्देशांकदेखील साधारणपणे 540 अंकांनी कमकुवत होत 54515 च्या स्तरावर बंद झाला. आयटी निर्देशांक अल्पशा घसरणीसोबत कार्यरत राहिला होता. निफ्टीमध्ये पाहता 50 पैकी 46 समभागांची विक्री पहायला मिळाली. अदानी इंटरप्रायझेसचा समभाग सर्वाधिक 6 टक्के घसरला. यानंतर आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील आणि मॅक्स हेल्थकेअर यांचे समभाग प्रत्येकी 4 टक्के घसरलेले होते. मेटल, रियल्टी आणि एनर्जी क्षेत्रातल्या समभागांची विक्री गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेली दिसून आली.  ज्यामुळे बाजारावर मोठा दबाव पहायला मिळाला. आयटी क्षेत्रातल्या समभागांची खरेदी  गुंतवणुकदारांनी केली.

कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ बाजाराला चिंता करायला लावणारी होती. होर्मुझ सामुद्रधुनीत बोटींवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे तेलाच्या पुरवठ्यांवर परिणाम होतो आहे. या सोबतच डॉलर, विदेशी गुंतवणुकदारांची विक्री त्याचप्रमाणे विविध कंपन्यांच्या नकारात्मक बातम्यांचा परिणाम गुरुवारी शेअर बाजारावर सर्वोच्च दबाव निर्माण करू शकल्या. मिडकॅप निर्देशांकातील समभागांमध्येसुद्धा मोठी विक्री दिसून आली. हा निर्देशांक इंट्रा डे दरम्यान 1500 अंकांपर्यंत कोसळला होता.

विविध क्षेत्रांची कामगिरी

गुरुवारी सर्वच क्षेत्राचे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले. यातही सर्वाधिक घसरण एनर्जी निर्देशांकामध्ये आणि एफएमसीजी निर्देशांकामध्ये पहायला मिळाली. एनर्जी निर्देशांक 1034 अंकांनी घसरत 35649 अंकांवर तर एफएमसीजी निर्देशांक 902 अंकांनी घसरत 43898 अंकांवर बंद झाला. यानंतर ऑटो निर्देशांक 626 अंकांनी तर फार्मा निर्देशांक 613 अंकांनी घसरलेला दिसला. कमोडीटीज, सीपीएसई, फायनान्शियल, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल व गॅस आणि रियल्टी यांचे निर्देशांकसुद्धा घसरणीत होते.

  • इन्फोसिस           997
  • टेक महिंद्रा      1496
  • अॅक्सिस बँक            1285
  • एलआयसी हौसिंग        537
  • आयएफसीआय             66
  • एनटीपीसी ग्रीन              90
  • आयसीआयसी लोंबार्ड    1624
  • दिपक नायट्राईड            1584
  • पीएनबी हौसिंग             1150
  • भारती हेक्साकॉम          1500
  • टाटा कम्युनिकेशन        1677
  • एसआरएफ                2485
  • बर्जर पेंटस                 467
  • जेएसडब्ल्यू सिमेंट        112
  • नेटवेब टेक्नो              4715
  • सॅजिलीटी                 43
  • जिलेट इंडिया         7263

  • अदानी एंटरप्रायझेस         2596
  • जेएसडब्ल्यू स्टील          1175
  • आयटीसी                    255
  • मॅक्स हेल्थकेअर           873
  • इंडिगो                       4813
  • टाटा मोटर्स पीव्ही         273
  • पॉवरग्रीड कॉर्प             244
  • श्रीराम फायनान्स            917
  • अपोलो हॉस्पिटल          7666
  • बीईएल                      367
  • आयशर मोटर्स           6767
  • इटर्नल                       319
  • एशियन पेंटस्              2311
  • एसबीआय लाईफ         1682
  • जिओ फायनान्स           211
  • बजाज ऑटो              9637
  • रिलायन्स                  1178
  • अदानी पोर्ट              1708
  • हिंडाल्को                  890
  • एनटीपीसी                309
Advertisement
Tags :

.