For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळवारी शेअरबाजारात मोठी घसरण

06:31 AM May 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंगळवारी शेअरबाजारात मोठी घसरण
Advertisement

सेन्सेक्स 1456 अंकांनी, निफ्टी 436 अंकांनी घसरला : कच्चे तेल, जागतिक तणावाचा परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

भारतीय शेअरबाजारासाठी मंगळवार हा पुन्हा एकदा मोठ्या घसरणीचा राहिला. सेन्सेक्स 1400 हून अधिक अंकांनी तर निफ्टी 436 अंकांनी घसरलेला होता. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ, जागतिक तणाव या पार्श्वभूमीवर शेअरबाजारात घसरण दिसून आली. दोन दिवसात बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला आहे.

Advertisement

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 1456 अंकांनी घसरुन 74559 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांकही 436 अंकांनी कोसळून 23379 अंकांवर बंद झाला. आयटी समभाग, बँकिंग समभाग कमकुवत झाल्याने बाजारावर दबाव वाढत गेला. याचदरम्यान एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटी रुपये बुडाल्याचे दिसून आले. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला होता आणि एकावेळी नीचांकी पातळी गाठली. बाजारात आयटी निर्देशांकही कमकुवत होत बंद झाला. यानेच बाजाराला संकटात टाकले. टीसीएस, इन्फोसिस व एचसीएल टेक्नॉलॉजी हे समभाग तर 52 आठवड्याच्या नीचांकावर कार्यरत होते.

एआय सेवाक्षेत्रात ओपन एआयची एंट्री झाल्याचा परिणाम आयटी समभागांवर दिसला. याचसोबत बँकिंग व फायनॅन्शीयल यांचे समभागदेखील दबावात दिसले आणि बाजाराला आणखी खाली आणण्यात यांनी हातभार लावला. श्रीराम फायनान्सचा समभाग सर्वाधिक कोसळला होता. असे असताना मिडकॅप व स्मॉलकॅप समभागांनीही नकारात्मक कामगिरी करत बाजाराचा मूड खराब करुन टाकला. मिडकॅप निर्देशांक 1554 अंकांनी कोसळून 59,705 वर बंद झाला. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर, युपीएल, एनएलसी इंडिया, कल्याण ज्वेलर्स आणि लार्सन अँड टुब्रो फायनान्स यांचे समभाग घसरणीत होते. बीएसईवरील सुचीबद्ध कंपन्यांच्या एकूण भांडवल मूल्यात 12 लाख कोटींची घसरण दिसली. सर्व क्षेत्रांचे निर्देशांक नुकसानीसोबत बंद झाले होते. रियल्टी आणि आयटी हे दोन क्षेत्रांचे निर्देशांक सर्वाधिक नुकसानीत होते. याचदरम्यान कच्च्या तेलाचे दर वधारलेले दिसले. ब्रेंट व्रुड तेलाचे दर 107 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले.

आशियाई बाजारात मिळताजुळता कल पाहायला मिळाला. दक्षिण कोरीयाचा कोस्पी निर्देशांक 2.29 टक्के घसरणीसह व्यवहार करत होता. जपानचा निक्केई 0.52 टक्के इतका तेजीत होता. हाँगकाँगचा हँगसेंग 0.22 टक्के इतका घसरणीत होता.

Advertisement
Tags :

.