Gold price India | सोन्या-चांदीच्या दरात 'महाघसरण'! इराण-अमेरिका युद्धाचा भारतीय बाजारावर मोठा परिणाम
१० ग्रॅम सोन्याच्या दरात ५,२०० रुपयांची मोठी कपात
नवी दिल्ली -इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. 'एमसीएक्स'वर सोन्याच्या दरात ५,२०० रुपयांची घसरण झाल्यामुळे किंमत प्रतितोळा १,५०,००० रुपयांच्या खाली आली. चांदीच्या दरातही सुमारे १५,००० रुपयांची घसरण झाल्यामुळे हा दर २,३०,००० रुपये प्रतिकिलोच्या खाली आला आहे.
गुरुवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर मौल्यवान धातूंच्या किंमती घसरल्यामुळे ग्राहकांनीमोठ्या प्रमाणात खरेदी करत 'लाभ' उठविला.जागतिक भू-राजकीय तणाबाच्या पार्श्वभूमीवर बायदे बाजारात गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. गुरुवारी दुपारी ३:५३ वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोने दर ६,४७२ ने घसरून प्रति १० ग्रॅम १,४७,०७८ रुपयांवर स्थिरावला. दरम्यान, चांदीच्याभावात १७,२५१ रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली. 'गुड रिटर्न्स' नुसार, दिल्लीत गुरुवारी २४-कॅरेट सोन्यासाठी प्रतिग्रॅम १५,२०६ रुपये इतका भाव होता. तर मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्यासाठी प्रतिग्रॅम १५,१९१ रुपये दर्शविण्यात आला होता.
गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर ग्राहकांना 'लाभ'
चांदी दर १७,२५१ रुपयांनी घसरला
सोन्यातही ६,४७२ रुपयांची घसरण