For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

विमा पॉलिसीच्या नियमांमध्ये मोठे बदल

06:25 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
विमा पॉलिसीच्या नियमांमध्ये मोठे बदल

आयआरडीएकडून नियमावलींमध्ये बदल

Advertisement

मुंबई :

इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीए) ने विमा पॉलिसीशी संबंधित अनेक विमा नियम बदलले आहेत. यासंदर्भात नियामकाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पॉलिसी परत करणे किंवा सरेंडर करणे यासारख्याशी संबंधीत नियमांचाही समावेश आहे. आयआरडीए (विमा उत्पादने) विनियम, 2024 अंतर्गत 6 नियम केले गेले आहेत.

Advertisement

हे नवीन नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील .जर विमा पॉलिसी घेतल्यापासून 3 वर्षांच्या आत पॉलिसी परत केली किंवा सरेंडर केली गेली, तर अशा परिस्थितीत रिटर्नच्या वेळी मूल्य समान किंवा कमी असेल.

Advertisement

पॉलिसीधारकाने 4 ते 7 वर्षांच्या दरम्यान पॉलिसी सरेंडर केली तर सरेंडर व्हॅल्यूमध्ये किंचित वाढ होऊ शकते. जर पॉलिसी निर्धारित कालावधीत परत केली तर बचत आणि कमाई दिली जाईल.

चौथ्या ते सातव्या वर्षात समर्पण केलेल्या पॉलिसींच्या समर्पण मूल्यात किरकोळ वाढ होऊ शकते. पॉलिसीधारकाने पॉलिसी मुदतीदरम्यान पॉलिसी परत केल्यास, कमाई आणि बचतीचा भाग त्याला दिला जाईल.

34 नियम 6 नियमांसह बदलले

19 मार्च रोजी झालेल्या बैठकीत, आयआरडीएकडून 6 नियमांसह 34 नियम बदलण्यात आले. तसेच दोन नवीन नियम आणले.

Advertisement
Tags :
×

.