For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad Crime | कराडात एमडी ड्रग्जचा मोठा पर्दाफाश; 95.78 ग्रॅम मेफेड्रोन जप्त, तिघे जेरबंद

11:49 AM May 31, 2026 IST | NEETA POTDAR
karad crime   कराडात एमडी ड्रग्जचा मोठा पर्दाफाश  95 78 ग्रॅम मेफेड्रोन जप्त  तिघे जेरबंद
Advertisement

                           वारुंजी फाटा येथे कराड शहर पोलिसांची धडक कारवाई

Advertisement

कराड :- कराड शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत एमडी अर्थात मेफेड्रोन ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वारुंजी फाटा परिसरात सापळा रचून पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोपींकडून 95.78 ग्रॅम एमडी मेफेड्रोन, तीन मोबाईल फोन आणि एक इनोव्हा कार असा एकूण 18 लाख 82 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत समीर शेख, नजर मुल्ला आणि फरदीन शेख या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या ड्रग्ज रॅकेटचे आणखी धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Advertisement

अमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी कराड शहर पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. काही जण इनोव्हा वाहनातून एमडी मेफेड्रोन विक्रीसाठी वारुंजी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती.

या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी वारुंजी फाटा परिसरात सापळा रचला. संशयित वाहनाची तपासणी केली असता आरोपींकडून 95.78 ग्रॅम एमडी मेफेड्रोन आढळून आले. पोलिसांनी तत्काळ तिघांना ताब्यात घेत अमली पदार्थ जप्त केले.

या कारवाईत 2 लाख 87 हजार 340 रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज, तीन मोबाईल फोन आणि एक इनोव्हा वाहन असा एकूण 18 लाख 82 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

दरम्यान, या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातील कलम 8(क), 21(क) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ड्रग्जचा पुरवठा नेमका कुठून होत होता याचा तपास पोलीस करत आहेत.

Advertisement
Tags :

.