For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानात मोठा हल्ला, 23 सैनिक ठार

06:25 AM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानात मोठा हल्ला  23 सैनिक ठार
Advertisement

बलुचिस्तानच्या लासबेला जिल्ह्यात घटना : बीएलएवर संशय

Advertisement

वृत्तसंस्था, क्वेटा

पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील लासबेला जिल्ह्यात सुरक्षा दलांवर मोठा हल्ला झाला आहे. पाकिस्तानच्या सैन्याचा ताफा तेथील एन-25 महामार्गावरून जात असताना हा हल्ला झाला. प्रारंभिक माहितीनुसार या हल्ल्यात 23 हून अधिक सैनिक मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेक जवान जखमी झाले आहेत.

Advertisement

लासबेलाच्या कशारी भागात हा हल्ला झाला आहे. तेथे फ्रंटियर फोर्सच्या सुमारे 15 वाहनांचा ताफा जात असताना विस्फोट झाला. या विस्फोटानंतर एका वाहनाला आग लागली होती. हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिकांना प्रथम बेला कॅम्पमध्ये हलविण्यात आले.

हा हल्ला बलूच लिबरेशन आर्मी म्हणजेच बीएलएकडून घडवून आणल्याचा आरोप आहे. बीएलएने मागील काही काळात पाकिस्तानी सुरक्षा दल, सरकारी इमारतींवरील हल्ले वाढविले आहेत.

लासबेला येथील घटनेनंतर पाकिस्तानी सैन्याने परिसरातील शोध मोहीम तीव्र केली आहे. विस्फोटानंतर महामार्ग बंद ठेवण्यात आला असून हल्ल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याकडून अद्याप कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. अशास्थितीत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लासबेला एन-25 बलुचिस्तानातील सर्वात महत्त्वपूर्ण मार्गांपैकी एक आहे. हा महामार्ग कराचीला क्वेटाशी जोडतो आणि प्रांताच्या अनेक रणनीतिक भागांमधून जातो. याच मार्गावरून सुरक्षा ताफा, सामान्य प्रवासी अन् मालवाहतुकीची वाहने धावत असतात. लासबेला हे कराचीपासून नजीक असून हा भाग किनारी मार्ग आणि पश्चिम बलुचिस्तानला बंदर शहराशी जोडणारा महत्त्वाचा भाग आहे.

Advertisement
Tags :

.