For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; सराईत घरफोड्या चोरट्याला अटक

10:00 AM Aug 31, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई  सराईत घरफोड्या चोरट्याला अटक
Advertisement

सोलापूर -सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने दरोडा व घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक केली. या गुन्हेगाराकडून पोलिसांनी १५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह २ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. उला उर्फ सुधीर नामदेव उर्फ नानज भोसले (वय २५, रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. भोसले याच्याकडून नातेपुते व माळशिरस पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले
Advertisement

असून तो माळशिरस व पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दरोडा व घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार उला भोसले हा गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल विक्रीसाठी फलटण कडून नातेपुते येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून

पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी नातेपुते येथील शिंगणापूर पाटी येथील हॉटेल आरव समोर डांबरी रोडवर सापळा लावून उला भोसले यास ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेवुन तपास केला असता त्याने त्याचे साथीदार भोलेनाथ उर्फ शन्या चंद्रकांत भोसले (रा. चाकोरे अकलूज) याच्यासोबत मिळून घरफोडीचे गुन्हे करून त्या घरफोडीतील सोन्याचे दागिने विक्री करीता नातेपुतेकडे जात असल्याचे सांगितले. सराईत गुन्हेगार उला उर्फ सुधीर नामदेव उर्फ नानज भोसले याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेल्या मुद्देमाल पैकी २ लाख १० हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम सोन्याचे 

दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण २ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील, पोलीस हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, अजय भोसले, पोलीस शिपाई सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंगाळे, किरण चव्हाण, दिलीप थोरात यांनी केली.
Advertisement
Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.