For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येळावी येथे भीषण अपघात टळला: 17 प्रवासी थोडक्यात बचावले

05:00 PM Jun 17, 2025 IST | Radhika Patil
येळावी येथे भीषण अपघात टळला  17 प्रवासी थोडक्यात बचावले
Advertisement

तासगाव :

Advertisement

तासगाव तालुक्यातील येळावी गावाजवळ मंगळवारी दुपारी एक मोठी दुर्घटना टळली. तासगाव आगाराची तासगाव–चिंचवड बस रस्त्याशेजारील नाल्यात अडकून थेट विहिरीत कोसळण्याच्या काही सेकंद आधीच थांबली. या अपघातात बसमधील 17 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.

ही घटना दुपारी अंदाजे 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान, कराड–तासगाव रस्त्यावर येळावी गावाजवळ घडली. बस पुण्याहून तासगावकडे परत येत असताना, निळकंठ बंगला परिसरात चालकाचे नियंत्रण सुटले. बस नाल्यातून घसरत थेट विहिरीच्या कडेपर्यंत गेली, मात्र नाल्यात चाके अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Advertisement

अपघातात जखमी झालेल्या 17 प्रवाशांपैकी 14 जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले, तर उर्वरित 3 गंभीर जखमींवर सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर बसमधील संतप्त प्रवाशांनी चालकाला धारेवर धरत मारहाण केली. नंतर, तासगाव आगाराच्या आपत्तीकालीन बसने सर्व प्रवाशांना तासगावमध्ये पोहोचवण्यात आले.

या अपघातामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी पसरली आहे. तासगाव आगाराने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.