कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वर्जीनियात सैन्यतळावर मोठी दुर्घटना

06:39 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

अमेरिकेच्या वर्जीनिया येथे एका सैन्यतळावर एअर शोची तयारी सुरू असताना एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. विमान हॅम्पटनमध्ये संयुक्त बेस लँगली-यूस्टिसवर लँड होताना दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मृत वैमानिकाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही. वैमानिक एअर पॉवर ओव्हर हॅम्पटन रोड्स एअर शोची तयारी करत होता. हा एअर शो चालू आठवड्याच्या अखेरीस तळावर आयोजित होणार होता.

आम्ही आमच्या वायुदल परिवाराच्या एका मित्राला गमाविले आहे. आमच्या पूर्ण जेबीएलई टीमकडून वैमानिकाचा परिवार आणि मित्रांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करू इच्छितो असे जॉइंट बेस लँगली-यूस्टिसचे कमांडर कर्नल मॅथ्यू ऑल्टमॅन यांनी म्हटले आहे.

एमएक्सएस एअरक्राफ्टच्या दुर्घटनेचा तपास केला जात असल्याचे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने सांगितले आहे. एमएक्सएस हे सिंगल सीट असलेले विमान आहे. सैन्याच्या फोर्ट यूस्टिस आणि लँगली एअर फोर्स बेसवर ही दुर्घटना घडली आहे. हा तळ एफ-22 रॅप्टर लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रनचे केंद्र आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article