जिल्हास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत मैत्रेयी बांदेकर प्रथम
मालवण वार्ताहर -
कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी वाचन मंदिर भरड मालवण येथे आयोजित जिल्हास्तरीय खुल्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत मैत्रेयी बांदेकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 40 कवींनी आपल्या स्वरचित कविता पाठवल्या होत्या त्यामधील 25 कवींच्या कवितेची काव्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेचा सविस्तर निकाल द्वितीय - सौ. मेधा मणेरीकर, तृतीय- आशिष पेडणेकर, उत्तेजनार्थ - प्रथम कु. महेश शेख द्वितीय- सुरभी त्रिंबककर स्पर्धेसाठी परीक्षण संग्राम कासले, सौ. नूरजहा नाईक यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्त पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी विश्वस्त अध्यक्ष रुजारिओ पिंटो, विजय आटक, सौ. वैदही जुवाटकर, श्रीमती हेमा परुळे कर, जयराम परुळेकर, सौ. मानसी दुधवडकर, साक्षी सावंत, संतोष कोचरेकर आधी उपस्थित होते.